सातारा शहरातील घरफोडीत 25 तोळे सोने चोरीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरातील मध्यवस्तीत एका घरात रविवारी घरफाेडी झाल्याची घटना आज (साेमवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत प्राथमिक माहितीनूसार 25 ताेळे साेने चाेरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबिय परगावी गेल्यानंतर घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

शहरातील कमानी हाैदच्या खालच्या बाजूस असणा-या गुरुवार पेठेत शिवाजीराव जेधे यांच्या घरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही चाेरी झालेली आहे. जेधे कुटुंबिय सुटी निमित्त परगावी गेल्याचा फायदा घेत चाेरट्यांनी घराचा कडी कोयंडा ताेडून घरात प्रवेश केल्याचे समाेर आले आहे.

दरम्यान घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पाेलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असल्याने चोरटे लवकरच सापडतील. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना येईल, असा दावा भगवान निंबाळकर यांनी म्हटले आहे.