हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) एक मोठी घटना घडली आहे. याठिकाणी भोले बाबांचा सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरी 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना हाथरसमधील रतिभानपूर भागात घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कार्यक्रम स्थळी गोंधळ उडाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रतिभानपूर येथे भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्संगाचा समारोप सुरू असतानाच तिथे चेंगराचेंगरी सुरू झाली. या चेंगराची इंग्रजीत तब्बल 23 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. यामध्ये अनेक लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.
या सर्व प्रकरणाची माहिती देत एटा एसएसपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितले आहे की, हाथरस जिल्ह्यातील मुगलगढ़ी गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. ज्यात अनेकजण जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाला. आतापर्यंत एटा हॉस्पिटलमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 23 महिला, 3 मुले आणि 1 पुरुष आहे. आता या 27 मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.