धक्कादायक! जेलमध्ये 270 पेक्षा अधिक कैदी महिलांवर बलात्कार; NCRB चा अहवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| NCRB ने म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालातून देशातील जेलमध्ये 2017 ते 2022 कालावधी 270 पेक्षा अधिक महिला कायद्यांवर बलात्कार (Rape Case) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक बलात्काराच्या घटना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये घडल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या या आकडेवारीनंतर पोलीस प्रशासनावर ओढले जात आहेत.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, कैदी महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये पोलिस, शासकीय नोकर, जेलचा स्टाप, रिमांड होम स्टाप यांचा समावेश आहे. त्यामुळे ही घटना अत्यंत घृणास्पद असून याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. आता बलात्काराच्या घटनेमध्ये संशयित सापडलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेत कैदी महिलांवर बलात्कार केल्यास आरोपीवर 376 (2) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. तसेच एखाद्या उच्च पदावरील अधिकाऱ्याने हे कृत्य केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते.

या अहवालात म्हटले आहे की, कैदी महिलांबरोबर पोलिस अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबल ही सहानभूतीची वागणूक देत नसल्याचे दिसून आले आहे. यासाठी पोलिसांमध्ये संवेदनशीलता आणि जगृतता निर्माण करण्याची गरज आहे. महिला कैदी या जेलमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार करण्याची पूर्ण संधी तेथील कर्मचाऱ्यांना आणि इतर व्यक्तींना मिळते. तर घरगुती हिंसाचारामुळे एखाद्या महिलेला अटक केल्यास तिला संरक्षण देणारे अधिकारी बलात्कार करतात. त्यामुळे या सर्व बाबींकडे गांभीर्याने बघून यासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच तुरुंगातील कैदी महिला गर्भवती होत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. कोलकाता उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेत, पश्चिम बंगालच्या तुरुंगात 196 मुले जन्माला आली असल्याचे समोर आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर न्यायालयाने कैदी महिलांच्या तुरुंगात पुरुष कर्मचाऱ्यांच्या काम करण्यावर बंदी घातली आहे. तसेच या मुलांचे वडील कोण आहेत याचा देखील शोध घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.