औरंगाबाद | घाटी रुग्णालयात सलाईन, इंजेक्शन, औषधे व सफाईसाठीच्या साहित्यासह कामगारांचा तुटवडा असून परिचारिका संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. घाटीत कामगारांच्या एकूण मंजूर पदांपैकी पावणेतीनशे पदे रिक्त असल्याने बाकी कर्मचाऱ्यावर कामाचा भार पडतो.
घाटी रुग्णालयाला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 744 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 436 पदे भरलेली आहे. याशिवाय 34 कर्मचारी 29-29 दिवसाच्या करारावर कार्यरत आहेत. 274 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी 250 पदे कंत्राटी तत्वावर भरण्यास मान्यता देण्यात यावी त्यांच्या वेतनावर होणारा खर्च भागविण्यासाठी शासकीय मान्यता अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे केली आहे.
घाटी रुग्णालयात संपूर्ण मराठवाड्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांची हेळसांड या ठिकाणी होताना दिसून येते. आणि जे कर्मचारी कामावर आहेत त्यांना अधिक ताण येतो. याबाबत परिचारिकेने आंदोलनही केले होते.




