व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हॅलो महाराष्ट्रतर्फे 3 दिवसीय योग शिबीराचे आयोजन; पोलीस- पत्रकारांची उपस्थिती

कराड । गणेशोत्सवाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रच्या वतीने कराड येथे ३ दिवसीय योगशिबीर आयोजित करण्यात आले आहे. काल शनिवार दिनांक ०३-०९-२०२२ रोजी या योगशिबिराचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बी. आर. पाटील, हॅलो महाराष्ट्र समूहाचे संस्थापक सीईओ आदर्श पाटील, राष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य श्रीकृष्ण शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते .

या योगशिबीराला कराड शहर परिसरातील पोलीस कर्मचारी आणि पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी योगाचार्य श्रीकृष्ण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानी योगाचे महत्त्व जाणून घेतले आणि प्रात्यक्षिक केलं. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जणांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होत. पोलीस आणि पत्रकार हे एक चांगला समाज निर्माण करण्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच समाजाचे आरोग्य चांगले राहू शकते. म्ह्णूनच हॅलो महाराष्ट्रने या खास योगा शिबिराचे आयोजन केलं आहे असं हॅलो महाराष्ट्रचे सीईओ आदर्श पाटील यांनी सांगितलं.

उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केलं. खरतर सध्याच्या या जीवनात पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणारे कोणीतरी आहे हे पाहून बर वाटलं असं म्हणत त्यांनी हॅलो महाराष्ट्रच्या या उपक्रमाचे कौतुक केलं. मी स्वतः दररोज योगा करतो असं सांगत सर्वानी नियमितपणे योगासने करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन रणजित पाटील यांनी उपस्थितांना केलं. यावेळी हॅलो महाराष्ट्र समूहाचे सकलेन मुलाणी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केलं तर विशाल पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.