हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक रेल्वेने प्रवास करतायत त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. मळवली रेल्वे विभागात उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी तीन दिवस ब्लॉक करण्यात येणार आहे. तसेच हा ब्लॉक 6 एप्रिल ते 8 एप्रिल 2025 या दरम्यात घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळेच लांबच्या रेल्वे गाड्या अन लोकलच्या वेळापत्रकात बदल केले गेले आहेत. याची पर्व कल्पना रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. तर हे तीन दिवसासाठी नवीन वेळापत्रक कसे असेल , हे जाणून घेऊयात.
या कामामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणा होणार –
लोणावळा-मळवली रेल्वे मार्गावर अप अन डाऊन मार्गावर चार स्टील गर्डर्सच्या उभारणीसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणा होणार असून, प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठीही हा निर्णय घेतला गेला आहे. अशी माहिती रेल्वेने दिलेली आहे. या ब्लॉकमुळे रेल्वेच्या विविध गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहेत. खालीलप्रमाणे या तीन दिवसीय ब्लॉकसाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे –
पहिला ब्लॉक – 6 एप्रिल (दुपारी 1:05 ते 4:05)
सीएसएमटी-चेन्नई एक्सप्रेस (22159) – ही गाडी लोणावळा येथे 4:05 पर्यंत नियमितपणे धावेल.
एलटीटी-काकीनाडा एक्सप्रेस (17222) – ही गाडी कर्जत येथे 3:20 पर्यंत नियमितपणे धावेल.
ग्वाल्हेर-दौंड एक्सप्रेस (22194) – या गाडीचे वेळापत्रक 10 मिनिटे पुढे ढकलले जाईल, तरीही ती नियमितपणे धावेल.
पुणे-लोणावळा ईएमयू आणि शिवाजीनगर-लोणावळा ईएमयू: या दोन्ही गाड्या मळवली येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.
लोणावळा-पुणे ईएमयू आणि लोणावळा-शिवाजीनगर ईएमयू – या गाड्या मळवलीहून नियमितपणे सुटतील.
दुसरा ब्लॉक – 7 एप्रिल (दुपारी 1:05 ते 2:35)
शिवाजीनगर-लोणावळा ईएमयू – मळवली येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
लोणावळा-पुणे ईएमयू – ही गाडी मळवलीहून नियमितपणे सुटेल.
तिसरा ब्लॉक – 8 एप्रिल (दुपारी 1:05 ते 3:05)
शिवाजीनगर – लोणावळा ईएमयू – मळवली येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
लोणावळा-पुणे ईएमयू – ही गाडी मळवलीहून नियमितपणे धावेल.
ब्लॉकचा उद्देश आणि महत्व –
या ब्लॉकचा मुख्य उद्देश मळवली आणि लोणावळा रेल्वे मार्गावर उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या स्टील गर्डर्सच्या उभारणीसाठी सुसंगत वेळ देणे आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे पायाभूत सुविधा सुधारल्या जातील आणि प्रवाश्यांच्या सुरक्षिततेत वाढ होईल. ब्लॉकच्या कालावधीत गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकतात, त्यामुळे प्रवाश्यांना रेल्वे सेवा वापरण्याआधी वेळापत्रकाची योग्य माहिती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.