व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई | मुंबई- अहमदाबाद(mumbai- ahmedabad highway) हा महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर अनेक प्रवाशांचा अपघात झाल्याची बातमी आपण पाहिली आहे. अशातच पुन्हा एकदा या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

मुंबई- अहमदाबाद mumbai- ahmedabad highway) राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडून गुजरातकडे जाणारी भरधाव क्रेटा कार वरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार टेम्पोवर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव क्रेटा कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोवर धडकल्याने हा अपघात झाल्याचा समोर आले आहे. या अपघाताचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचा आपल्याला या फोटो मध्ये पाहायला मिळत आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की हा अपघात केवढा भीषण होता ते.