भाजपकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज भाजपकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांच्या दोन्ही आता जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता भाजपने तिसरी ही यादी जाहीर करून एकूण उमेदवारांना विविध भागात संधी दिली आहे. भाजपने आपल्या तिसऱ्या यादीत चेन्नई सेंट्रलमधून विनोज पी सेल्वम, वेल्लोरमधून एसी शम्मुगम आणि कन्याकुमारीमधून पोन राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपच्या तिसऱ्या यादीतील नावे

चेन्नई साऊथ – तमिलिसाई सौंदर्यराजन

नीलगिरी – एल मुरुगन

कोयंबटूर – ए अन्नामलाई

चेन्नई सेंट्रल – विनोज पी सेल्वम

वेल्लोर- एसी शम्मुगम

कृष्णगिरि- सी नरसिम्हा

पेराम्बलुर – टी आर पारिवेंदर

थुथुक्कुड़ी – नेनार नागेंद्रन

कन्याकुमारी- पोन राधाकृष्णन

दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 276 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता उर्वरित उमेदवारांची नावेही पक्ष लवकरच जाहीर करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी सर्वात प्रथम भाजपने 195 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यानंतर पक्षाकडून 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. आता पक्षाने तिसऱ्या यादीत 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.