मोटर सायकल चोरणारे 3 जण सातारा व सांगली जिल्ह्यातून तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल वाहन चोरी करणाऱ्या टोळीप्रमुखांसह तिघांना तडीपार करण्यात आले आहे. याबाबतची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केली आहे. तिघांना सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव व शिराळा तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

याबाबतची पोलिस प्रमुख समीर शेख यांनी दिलेली माहिती अशी, कराड परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीला तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये टोळीचा प्रमुख, महादेव बाळासो कोळी (वय- 30 वर्षे, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा, जि. सांगली), किशोर कृष्णा गुजर (वय- 24 वर्षे, रा. कोडोली, ता. कराड)(टोळी सदस्य), रोहीत आनंदा देसाई  (वय- 23 वर्षे, रा. तांबवे, ता. कराड) यांना जिल्हयातुन तडीपार करण्यात आले आहे.

याबाबतचा प्रस्ताव कराड तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55 अन्वये सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांनी दोन वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्हयातील वाळवा, कडेगाव, शिराळा तालुका हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.