धक्कादायक ! राज्यातील हवामान बदलाचा अंदाज देणारे 3 रडार नादुरुस्त ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे गुजरात महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये तौक्ते चक्रीवादळाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. केवळ समुद्र किनारीच नव्हे तर राज्यातील इतरही भागांमध्ये या वादळाचा परिणाम म्हणून मुसळधार पाऊस होत असल्याचे पहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना तसेच घरं पडल्याच्या घटना समोर येत असताना. आणखी एक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे की हवामानातील बदलाचा अचूक अंदाज व्यक्त करणाऱ्या राज्यातील चार डॉपलर रडार पैकी तीन रडार नादुरुस्त आहेत. याबाबतचा आरोप हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी केला आहे.

अशा आपत्कालीन परिस्थितीत जर यंत्रणा काम करत नसेल तर हाहाकार माजू शकतो अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे याचं गांभीर्य वाढले आहे. याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाला सूचित केल्याची माहिती देखील दिली आहे. अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळ सक्रिय असताना आय एम डी चे मुंबईचे रडार बंद असल्याचे समोर येत आहे. मुंबईला बंद पडले असल्यामुळे चक्रीवादळाचा धोका असलेल्या रत्नागिरी ते पालघर आणि नाशिक ते सातारा या पाठातील हवामानाचा अचूक अंदाज मिळणे मात्र कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त सॅटॅलाइट इमेज वर अवलंबून राहावे लागणार आहे.

दरम्यान रडार बंद असल्याने रविवारी दुपारी एक वाजून 26 मिनिटांनी नंतर कोणतेही अपडेट आले नव्हते. मात्र संध्याकाळी सातच्या सुमारास मुंबई रडारच्या इमेजेस पुन्हा खुला केल्या तरीही रडार योग्य प्रकारे काम करत नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या राज्यात असलेल्या परिस्थितीत दरम्यान समोर आलेली ही धक्कादायक माहिती अजूनच चिंता वाढवणारी ठरते आहे.

Leave a Comment