Accident News : ST बस- दुचाकीच्या अपघातात 3 युवक जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. त्यातच भरीस भर म्हणून साताऱ्यातील लोणंद निरा रोडवर लोणंद पासून 2 किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाण पुलावर एसटी आणि मोटरसायकलच्या भीषण अपघात मोटरसायकल वरील 3 युवक जागीच ठार झाले आहेत. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिंपरे खु ॥ तालुका पुरंदर जि. पुणे येथील आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही एसटी मंगळवेढाहून पुण्याकडे जात होती तर हे तिन्ही युवक निरेकडून लोणंद कडे जात होते. त्याच दरम्यान, काल सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एसटी आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये मोटरसायकल वरील अनिल नामदेव थोपटे – गायकवाड वय २५, पोपट अर्जन थोपटे – गायकवाड वय २३ आणि ओंकार संजय थोपटे – गायकवाड वय २२ रा. पिंपरे खुर्द ता. पुरंधर जि. पुणे तीनही युवक जागीच ठार झालेत.

अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पीएसआय गणेश माने, तसेच त्यांच्या सहकार्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील वाहने बाजूला करून तीनही मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले. काही वेळासाठी विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली असून या गुन्ह्याची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.