दरोड्यातील तब्बल 2 कोटीचा मुद्देमाल सुरक्षित : वडगाव जिल्हा बॅंक चोरी प्रकरणात 3 युवक अटकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खटाव तालुक्यातील वडगांव जयराम स्वामी येथे दि. 7 रोजी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज, कापून बँकेचे आतमध्ये प्रवेश केला. तसेच गॅसकटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. सदर बाबत माहिती प्राप्त होताच तात्काळ औंध पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या गुन्ह्यात 10 तासाच्या आत तीन संशयित आरोपींना स्काॅर्पिअो गाडीसह ताब्यात घेण्यात यश आले आहे.

या प्रकरणात प्राप्त माहितीच्या आधारे गुप्त माहितीदार पेरून तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी काही पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत बँक कर्मचारी यांनी सुरक्षीत ठेवलेला मुद्देमालाची खात्री केली, त्यांना रोख रक्कम व सोने चांदीचे दागिण्याचा एकुण 1 कोटी 95 लाख 90 हजार 441 रूपयाचा मुद्देमाल सुरक्षित मिळून आला. त्यानंतर याबाबत औध पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. औंध पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय. पी. दराडे यांनी पोलीसांच्या तिन वेगवेगळया टिम बनवून सीसीटीव्ही व मोबाईल सीडीआर यांचे तांत्रिक माहितीवरून दोन संशयीत आरोपींना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चार चाकी स्कॉर्पिअो क्रमांक (एमएच-06- क्यू- 8888) ही गाडीसह सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच एका आरोपीस वडगांव ज. स्वा. (ता. खटाव) येथून ताब्यात घेण्यात आले.

सदर गुन्हयातील तपासाचे अनुषंगाने गोपनीय बातमीदाराचे मदतीने व सीसीटीव्ही फुटेज चेक करून व मोबाईल सीडीआर यांचे तांत्रिक माहितीवरून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून संशयित आरोपी हर्षवर्धन हरिशचंद्र घार्गे (वय- 20 वर्षे, रा. शाहुनगर ता. जि. सातारा), यश संजय घार्गे (वय- 19 वर्षे, रा. दौलत नगर ता. जि. सातारा) आणि रूषीकेश सोमनाथ नागमल (वय- 20 वर्षे, रा. वडगांव ज. स्वा. ता. खटाव) यांना सदर गुन्ह्यात 10 तासाच्या आत जेरबंद करण्यात आले आहे.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षकअजित बो-हाडे यांचे सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक डी. पी. दराडे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सपोफी जाधव, पोलीस नाईक राहुल सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल किरण हिरवे, पोलीस कॉन्स्टेबल महेश जाधव यांनी सदरची कारवाई केलेली आहे.