जबरा फॅन!! संगमरवरी दगडांनी साकारली 30 फुटांची शाहरुखची प्रतिमा; Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जवान चित्रपटाने पहिल्याच दिवशी 129.60 कोटींचा गल्ला केला आहे. या चित्रपटासाठी शाहरुख खानला चाहत्यांकडून भरभरून प्रेम दिले जात आहे. एका चाहत्याने तर शाहरुख खानच्या प्रेमापोटी तब्बल 30 फुटांची संगमरवरी दगडांनी त्याची प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेचे सध्या सोशल मीडियावर तुफान कौतुक केले जात आहे. तसेच, प्रतिमा साकारताना शाहरुख खानच्या चाहत्याचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रीतम बॅनर्जी नावाच्या कलाकाराने शाहरुख खानची संगमरवरी दगडाने तब्बल 30 फुटांची प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रीतम संगमरवरीच्या लहान दगडांनी शाहरुख खानची प्रतिमा साकारताना दिसत आहे. प्रीतमने साकारलेल्या शाहरुख खानच्या प्रतिमेचे शूट ड्रोनच्या साह्याने घेण्यात आले आहे. ज्यामुळेच शाहरुख खानची भव्य अशी प्रतिमा आपल्याला बघता येत आहे.

https://www.instagram.com/reel/Cw10HLvLhkz/?igshid=MzRlODBiNWFlZA==

मुख्य म्हणजे, शाहरुख खानच्या प्रतिमेचा व्हिडिओ इंस्टाग्राम या अकाउंटवर शेअर करत प्रीतमने म्हटले आहे की, शाहरुखचे पांढऱ्या संगमरवरी दगडांच्या चिप्सने पोर्ट्रेट बनवण्यात आले आहे. हे 30 फुटांचे पोर्ट्रेट माझ्या हृदयातून आले आहे. शाहरुख खानसाठीचे माझे प्रेम माझ्याकडे पेक्षाही जास्त आहे. मला वाटते की त्याने हे पाहावे. दरम्यान, प्रीतमच्या कलेचे नेटकऱ्यांकडून विशेष कौतुक केले जात आहे. तसेच त्याच्या पोर्ट्रेटवर भरभरून कमेंट केल्या जात आहेत.

नुकताच शाहरुख खानचा जवान चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या जवान चित्रपटासाठी शाहरुख खानला शुभेच्छा देण्याकरिता प्रतिमेने पोर्ट्रेट साकारले आहे. हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी प्रीतमने दिवस-रात्र मेहनत घेतली आहे. या पोर्ट्रेटमधून प्रीतमचे शाहरुख खानवरील प्रेम दिसून येत आहे. प्रीतमने साकारलेल्या कलाकृतीच्या व्हिडिओला इंस्टाग्रामवर 3 मिलियन पेक्षा देखील जास्त लोकांनी पाहिले आहे. तर 6 लाख पेक्षा जास्त कमेंट्स या व्हिडिओवर करण्यात आल्या आहेत.