घर बघावे बांधून ! अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. सध्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी तर घर घेणे म्हणजे तारेवरची कसरत होऊन बसले आहे असे असताना आता रिअल इस्टेट क्षेत्रातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील प्रमुख शहरातील 314 गृहप्रकल्प दिवाळखोरीत निघाले आहेत.
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या 314 महारेरा नोंदणीकृत निवासी प्रकल्पांविरोधात दिवाळखोरीची कार्यवाही सुरू आहे. महारेरा ने केलेल्या तपासणीमध्ये राज्यातल्या 314 प्रकल्प दिवाळीखोरीच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे या प्रकल्पात विरोधात वित्तीय संस्था बँक आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांनी राष्ट्रीय कायदा न्याय अधिकरणाकडे धाव घेतली आहे. या प्रकल्पाच्या विरोध दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे. हे प्रकल्प कधीही दिवाळीखोर घोषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पांमध्ये घर खरेदी करताना अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागू शकतो.
कुठे पहाल यादी?
या प्रकल्पांमध्ये सर्वाधिक 236 प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्रात आहेत. या प्रकल्पापैकी काम सुरू असलेल्या 56 प्रकल्पांमध्ये 34 टक्क्यांच्या पेक्षा जास्त घरांची नोंदणी झाली आहे. तर 194 गृह प्रकल्प हे लास्ट प्रोजेक्ट असून त्यामध्ये 61 टक्क्यांपेक्षा जास्त घर रजिस्ट्रेशन झाली आहेत. 64 प्रकल्प हे पूर्ण झालेले असून त्यातल्या 84% घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. ही यादी महारेराच्या वेबसाईटवर जाहीर केली आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर ही यादी एकदा नक्की तपासून पहा अन्यथा फसवणूक होण्याची मोठी शक्यता आहे.
काय सांगते आकडेवारी
उपलब्ध आकडेवारीनुसार मुंबई उपनगरातील 88 पैकी 51, पुण्यातील 52 पैकी 45, तर ठाण्यातील 106 पैकी 52, पालघर मधील 18 पैकी 16 गृह निर्माण प्रकल्प हे दिवाळखोरी प्रक्रिया अंतर्गत नोंदवले गेले आहेत. याशिवाय दिवाळखोरी प्रक्रियेत असलेल्या मुंबईतील नऊ शहरांपैकी दोन सर्वसमावेशक प्रकल्पांमध्ये 68% सदनिका नाशिक मधील तीन समावेशक प्रकल्पांमध्ये 34% आणि रायगड मधील 15 पैकी 13 प्रकल्पांमध्ये 32 टक्के सदनिकांची नोंदणी झाली आहे.
याबाबत माहिती देताना महारेराचे अध्यक्ष मनोज सैनिक यांनी सांगितले की, ” महारेरा घर खरेदीदारांची गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे महारेराला कर्जबाजारी आणि दिवाळीखोर प्रकल्पांची माहिती मिळते. महरेरा ग्राहकांच्या माहितीसाठी ती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करते 314 दिवाळखोर प्रकल्पांची ही यादी त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. गेल्यावेळी ही अशा दिवाळीखोर प्रकल्पांची जिल्हा निहाय यादी एप्रिलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामुळे चांगली मदत मिळाली ही बाब खुद्द अनेकांनी महारेराला सांगितले. त्यामुळे महारेरा वेबसाईटवरील यादी पाहूनच घर खरेदी करण्याचा आवाहन करण्यात येत आहे. अशी प्रतिक्रिया अध्यक्ष मनोज सैनिक यांनी दिली आहे