लोणंदला 321 फूट लांब तिरंग्याची रॅली : “हर घर तिरंगा” अभियान जनजागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणंद शहरातून 321 फूट लांबीच्या तिरंग्यासह  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव “हर घर तिरंगा” अभियान जनजागृती फेरी काढण्यात आली. एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी मित्र समुहाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. लोणंदच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, एनसीसी, आरएसपी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

लोणंद शहरातून काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत 500 विद्यार्थी- विद्यार्थीनीनी सहभाग घेतला. संपूर्ण शहरातुन वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. यावेळी मालोजीराजे विद्यालयाच्या बॅन्ड पथकाने नागरिकांचे लक्ष वेधले होते. या रॅलीत न्यू इंग्लिश स्कूल लोणंद, मालोजीराजे विद्यालय आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

लोणंद शहरातील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी झाले होते. लोणंद शहरातील मुख्य बाजारपेठेसह छोट्या- मोठ्या गल्लीतून 321 फूट लांब तिरंग्याची रॅली विद्यार्थ्यांनी काढली. यावेळी देशभक्तीपर घोषणा दिल्या.