औरंगाबाद : वाळूज भागात एका तरुणाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास नांदेडा शिवारात उघडकीस आली. 35 वर्षीय मृत तरुणाचे विलास आसाराम थोरात (आसेगाव) असे असे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
नांदेडा शिवारातील गट नं. 74 मध्ये देविदास किसान मते यांची जमीन व विहिर आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती एमआयडीसीसी वाळूज पोलिसांना मिळाली.
पोलिस उपनिरीक्षक राहुल निर्वळ व त्याच्या सहकार्यांनी घटनास्थळी पाहणी केली. या विहिरीत पाणी असल्याने पोलिसांनी पदमपुरा अग्निशमन विभागाला कळविले. उप अग्निशमन अधिकारी डि. डि. साळुंके, मोहन मुंगूसे,लक्ष्मण कोल्हे, शेख समीर, संग्राम मोरे, परमेश्वर साळुंखे, शेख तन्वीर, आदींनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून अनोळखी इसामास बाहेर काढले.