4 कोटींच्या पुढील लक्झरी घरे विक्रीत 53% वाढ ; उच्च-मध्यमवर्गीयांमुळे मागणी वाढली

housing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

2024 मध्ये भारतात 4 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी घरांसाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सात प्रमुख शहरांमध्ये अशा घरांची विक्री 53% ने वाढली आहे. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी CBRE च्या अहवालानुसार, 2024 मध्ये एकूण 19,700 लक्झरी घरांची विक्री झाली, तर 2023 मध्ये ही संख्या 12,895 होती. याबाबतची माहिती बिझनेस स्टॅण्डर्ड कडून देण्यात आली आहे. चला पाहूया काय सांगते आकडेवारी ?

दिल्ली-एनसीआर आघाडीवर

दिल्ली-एनसीआर हा लक्झरी घरांचा सर्वात मोठा बाजार ठरला आहे. 2024 मध्ये या प्रदेशात 10,500 युनिट्सची विक्री झाली, जी 2023 मधील 5,525 युनिट्सच्या तुलनेत दुप्पट आहे.राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये उच्च उत्पन्न गटातील खरेदीदार आणि एनआरआय (नॉन-रेसिडंट इंडियन्स) यांच्यातील मागणीमुळे उच्च श्रेणीतील घरांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

CBRE चे चेअरमन आणि सीईओ अंशुमान मॅगझीन म्हणाले, “ही गती कायम राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. विक्री आणि नव्या युनिट्सच्या लॉन्चेस पुढील काही तिमाहींमध्ये स्थिर राहतील.” त्यांनी असेही सांगितले की, नोएडा, बेंगळुरू, पुणे आणि चेन्नईसारखी परंपरेने मध्यम-स्तरीय प्रकल्पांसाठी ओळखली जाणारी शहरे आता अधिक लक्झरी प्रकल्पांकडे वळताना दिसत आहेत.

DLF Home Developers चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी आकाश ओहरी यांनी सांगितले की, “घरमालकीबाबत लोकांच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल झाला आहे. स्वतःचे घर असणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव झाली आहे.” त्यांनी दिल्लीतल्या लक्झरी हाऊसिंग मार्केटमधील सकारात्मक बदलांवरही भर दिला.

मुंबई आणि इतर शहरांमधील ट्रेंड

लक्झरी घरांच्या बाजारातील मुख्य प्लेअर मुंबईत विक्री वाढली आहे. 2024 मध्ये मुंबईत 5,500 लक्झरी युनिट्स विकली गेली, जी 2023 च्या 4,200 युनिट्सच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे.

पुण्यातही लक्झरी घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे, 2024 मध्ये विक्री 825 युनिट्सवर पोहोचली, जी 2023 मध्ये 400 युनिट्स होती.
तथापि, बेंगळुरूमध्ये विक्रीत किंचित घसरण झाली, 2024 मध्ये 50 युनिट्स विकली गेली, तर 2023 मध्ये ही संख्या 265 होती.

कोलकातामध्ये विक्री 310 युनिट्सवरून 530 युनिट्सपर्यंत वाढली, तर हैदराबादमध्ये 2023 च्या 2,030 युनिट्सच्या तुलनेत 2024 मध्ये 2,100 युनिट्सची विक्री झाली. चेन्नईत विक्री 165 युनिट्सवरून 275 युनिट्सपर्यंत वाढली आहे.

लक्झरी घरे, एक स्थिर गुंतवणूक

उच्चभ्रू घरांना आधुनिक सुविधा आणि प्रीमियम लोकेशन मिळाल्यामुळे देशभरात अशा घरांची मागणी वाढत आहे. 2024 मध्ये लक्झरी हाऊसिंग सेक्टरने अनेक शहरांमध्ये वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे हा गृहनिर्माण क्षेत्राचा महत्त्वाचा घटक बनला आहे.