हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारने (Central Government) महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर इतर राज्यातील सरकारने देखील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. मात्र अजूनही महाराष्ट्र राज्य सरकारने महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिंदे सरकार या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कधी वाढ करणार? असा सवाल सतत विचारला जात आहे. आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून 2024 रोजी लागणार आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य सरकार शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याबाबत अधिकृत निर्णय अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच पुढील महिन्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी (4% DA hike) वाढ होऊ शकते. या बातमीमुळे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने जर लोकसभा निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली तर याचा लाभ कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून घेता येईल. जुलै महिन्याच्या पगाराबरोबरच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जाईल. तसेच या पगारातच फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. दरम्यान, याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ(4% DA hike) करण्याबाबत सरकार मोठा निर्णय घेईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकार यासंदर्भात नेमका निर्णय कधी घेईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.