मराठवाड्यात रेल्वेचं मोठं जाळं असून दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. छत्रपती संभाजी नगर शहरातून उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. आता मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून संभाजीनगरहून जाणाऱ्या चार एक्सप्रेस गाड्या सिकंदराबाद रेल्वे स्थानक वगळून धावणार आहेत. मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा फटका! चार एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदलला
मराठवाड्यातील हजारो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या चार महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या आता थेट सिकंदराबाद स्थानकावर थांबणार नाहीत. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे दररोज २०,००० हून अधिक प्रवाशांना गैरसोय होणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास आणि खर्च सहन करावा लागणार आहे.
काय बदल होणार?
चार गाड्या सिकंदराबादऐवजी चारलापल्ली आणि मौलाअली जी कॅबिन स्थानकावरून धावणार आहेत. सिकंदराबाद स्थानकापासून हे स्थानक सुमारे ८ किमी दूर, त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेला या बदलांसाठी २ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
प्रवाशांना येणाऱ्या अडचणी
हैदराबादला जाणाऱ्या ८,००० प्रवाशांना रोज मोठी गैरसोयनिर्माण होणार आहे. सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून अन्यत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक वेळ आणि खर्च सहन करावा लागणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या देवगिरी आणि गुंटूर एक्स्प्रेस आधीच प्रवाशांसाठी असुविधाजनक, आता मार्ग बदलल्याने अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बदल होणाऱ्या गाड्या
नरसापूर नगरसोल (12787)
नरसापूर नगरसोल (17231)
साईनगर शिर्डी-मछलीपट्टणम (17207)
साईनगर शिर्डी-काकीनाडा (17205)
रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातून सिकंदराबादकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे मोठे नुकसान होणार आहे. अतिरिक्त प्रवास आणि खर्चामुळे नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत. या निर्णयावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तो मागे घेतला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.