बारामतीत बायोगॅसची टाकी साफ करताना 4 जणांचा गुदमरून मृत्यू; तिघे एकाच कुटुंबातील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती तालुक्यातील खांडज येथे बायोगॅस टाकीची साफसफाई करताना गुदमरून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. हे तीन जण एकाच कुटुंबातील होते. बायोगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. चेंबरची स्वच्छता करण्यासाठी एक जण टाकीत उतरला होता, परंतु तो अडकल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बाकीचे गेले आणि यामध्ये चौघांचा सुद्धा दुर्दैवी अंत झाला. टाकीत पडून गुदमरल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केलं होत, मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपला प्राण सोडला

भानुदास अंबादास आटोळे (वय ६०) , प्रवीण भानुदास आटोळे( वय ३२), प्रकाश सोपान आटोळे(वय ५५) आणि बाबा पिराजी गव्हाणे(वय ३८) अशी या चौघाजणांची नावे आहेत. यामधील भानुदास अंबादास आटोळे आणि प्रवीण भानुदास आटोळे हे पिता- पुत्र आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह अनेक लोकांनी बारामती शहरातील सिल्वर जुबली हॉस्पिटलकडे धाव घेत गर्दी केली.