Tuesday, January 31, 2023

साताऱ्यात लग्नातून 4 महिलांचे सोन्याचे दागिने लंपास

- Advertisement -

सातारा | शहरातील संगमनगर परिसरातील एका मंगल कार्यालयातून चार महिलांचे सुमारे 1 लाख 83 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत. संगमनगर परिसरात सातारा- कोरेगाव रस्त्यावर मंगल कार्यालय आहे. दुपारी तीन ते साडेपाच या कालावधीत मंगल कार्यालयातील कार्यक्रमात आलेल्या चार महिलांचे अनोळखी चोरट्याने दागिने लांबविले.

एका लग्नास आलेल्या आशा रामचंद्र अनपट (रा. अनपटवाडी, ता. वाई), शुभांगी धनाजी जाधव (रा. शिवराज पेट्रोल पंप, सातारा), हेमलता विजय मोरे (रा. दुर्गा पेठ, सातारा), प्रणिता सागर बर्गे (रा. कोरेगाव, ता. कोरेगाव) या चार महिलांचे एकूण 1 लाख 83 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले आहेत.

- Advertisement -

याबाबत आशा अनपट यांनी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. महिला हवालदार अवघडे तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर शहर पोलिसांनी पाहणी केली. गुन्ह्याच्या तपासासाठी पथक तयार करण्यात आले आहे. मंगल कार्यातून गेल्या महिन्यात चक्क नवरी मुलीचे लाखो रूपयाचे दागिने लंपास करण्यात आले होते. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.