शेतावरून चोरलेल्या 43 मोटारी हस्तगत : कराड तालुक्यातील 7 जण ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पेरले व कालगाव (ता. कराड) गावातील सात जणांनी मिळून कराड तालुक्यातील कालगांव, पेरले, भुयाचीवाडी, खराडे वगेरे गांवामध्ये विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या चोरट्यांच्याकडून ताब्यात घेवून चोरीस गेलेल्या 43 इलेक्ट्रीक मोटारी, गुन्हा करताना वापरलेली हत्यारे, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल असा एकुण 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेतकऱ्यांच्या शेतावरील, विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथकास तयार केले आहे. या विशेष पथकाने संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसोशिने व कौशल्याने विचारपूस केली. या चोरट्यांनी उंब्रज, औंध, बोरगांव, तळबीड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये अभय जनार्दन चव्हाण, आप्पा रघुनाथ सातपुते, गणेश बाळासोा कांबळे , गणेश महेंद्र चव्हाण (सर्व रा. पेरले, ता. कराड, जि. सातारा), शुभम कालिदास जेटीथोर, साहिल कालिदास जेटीथोर, कपिल सत्यवान जेटीथोर (सर्व रा. कालगांव, ता. कराड जि. सातारा) अशी सात संशयित चोरट्याची नावे आहेत.

सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अरुण देवकर, सपोनि संतोष तासगांवकर, रमेश गर्ज, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोउन अमित पाटील, मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, धीरज महाडीक, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.