हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये आजवर हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वाद नाजूक विषय राहिला आहे. अशातच आता आर्थिक सल्लागार समितीने हिंदू आणि मुस्लिम (Hindu And Muslim) यांच्यातील लोकसंख्येसंदर्भात (Population) अत्यंत महत्त्वाचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, भारतात 1950 पासून हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. तसेच, मुस्लिमांच्या लोकसंख्येचा आलेख झपाट्याने वाढला आहे. यासह 38 इस्लामिक देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे.
हिंदूंच्या लोकसंख्येत घट
आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालानुसार, 1950 ते 2015 दरम्यान भारतातील हिंदूंची लोकसंख्या 7.82 टक्क्यांनी कमी झाली आहे. याच काळात मुस्लिमांच्या लोकसंख्येमध्ये 43.15 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, 1950 मध्ये हिंदूंची संख्या 84.68 टक्के होती. मात्र, 2024 मध्ये हिंदूंची संख्या 78.06 टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच या काळात हिंदूंची लोकसंख्या 7.82 टक्क्यांनी घटली आहे. दुसऱ्या बाजूला, 1950 मध्ये भारतात मुस्लिमांची संख्या 9.84 टक्के होती. परंतु 2015 मध्ये हीच संख्या 14.09 टक्क्यांनी वाढली. 1950-2015 दरम्यान मुस्लिम लोकसंख्येमध्ये 43.15 टक्के वाढ दिसून आली आहे.
इतकेच नव्हे तर या अहवालानुसार, सध्याच्या घडीला भारतामध्ये अल्पसंख्याकांची वाढ होत चालली आहे. अहवालात दिसून आली आहे की, भारतातील अल्पसंख्याक सुरक्षित आहेत. त्याचबरोबर, भारतात फक्त मुस्लिमच नाही तर शीख आणि ख्रिश्चन धर्मीयांचीही लोकसंख्या वाढली आहे. भारतात शीखांची लोकसंख्या 6.58 टक्क्यांनी वाढली आहे. तर ख्रिश्चनांची लोकसंख्या 5.38 टक्क्यांनी वाढली आहे. परंतु, भारतातील पारशी आणि जैन धर्माच्या लोकांची लोकसंख्या कमी झाली आहे.
इतर देशात मुस्लिमांची संख्या
दरम्यान, अहवालानुसार, 38 मुस्लिम बहुल देशांमध्ये मुस्लिमांचा वाटा वाढला आहे. 950 मध्ये पाकिस्तानात मुस्लिमांची संख्या 77.45 टक्के होती. आता शेजारील देशात मुस्लिमांची संख्या 80.36 टक्के झाली आहे. मधल्या काळात बांगलादेशातील मुस्लिमांची संख्या 74.24 टक्क्यांवरून 88.02 टक्के झाली आहे. अफगाणिस्तानमधील मुस्लिम लोकसंख्या 88.75 टक्क्यांवरून 89.01 टक्के झाली आहे. तर मालदीवमध्ये मुस्लिमांची संख्या 99.83 टक्क्यांवरून 98.36 टक्क्यांपर्यंत घसरली आहे.