महाराष्ट्रात 45 रोपवे प्रकल्पांची मंजुरी; रायगड, माथेरानसह ‘या’ पर्यटन स्थळांचा समावेश

ropeway projects
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन अन वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. राज्य सरकारने 45 नवीन रोपवे प्रकल्पांची मंजुरी दिली आहे, ज्यामुळे प्रसिद्ध पर्यटन स्थळांना अधिक पर्यावरणपूरक आणि सुलभ कनेक्टिव्हिटी मिळेल. नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) यांच्या नेतृत्वाखाली हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे अनके पर्यटकांना मोठी खुशखबर मिळाली आहे.

चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होणार –

या प्रकल्पामुळे रायगड किल्ला, माथेरान आणि एलिफंटा लेणी यांसारख्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक आकर्षणांपर्यंत प्रवास करणे अधिक सोपे आणि आरामदायक होईल. विशेषत: रायगड किल्ला, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची राजधानी म्हणून ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, तिथे चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होईल. माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन असून त्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि प्रदूषणमुक्त वातावरण पर्यटकांना आकर्षित करते, आणि एलिफंटा लेणी, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे, तेथील प्रवास देखील सुलभ होईल.

NHLML कडे या प्रकल्पाची जबाबदारी –

अलिबाग चौपाटी ते अलिबाग किल्ला आणि इतर प्रमुख पर्यटन स्थळांपर्यंतच्या कनेक्टिव्हिटीवर देखील काम करण्यात येणार आहे . प्रकल्पामुळे पर्यटन स्थळांवर गर्दी कमी होईल आणि वाहतूक कोंडीही हलका होईल. शाश्वत पर्यटन आणि पर्यावरणपूरक प्रवासावर जोर देत महाराष्ट्र सरकार या प्रकल्पाला चालना देत आहे. NHLML ने या प्रकल्पाची जबाबदारी घेतली आहे, आणि प्रकल्पासाठी आवश्यक जमीन राज्य संस्था 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देतील. प्रकल्पाची व्याप्ती रायगड, माथेरान, एलिफंटा लेणी, सिंहगड किल्ला, महाबळेश्वर, आणि कुणकेश्वर मंदिर या ऐतिहासिक ठिकाणांपर्यंत विस्तारली जाणार आहे.

पर्यटनाच्या शाश्वत विकासाचा भाग –

हा प्रकल्प महाराष्ट्रातील पर्यटनाच्या शाश्वत विकासाचा भाग असून पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देईल. रोपवे नवे अनुभव देण्यासोबतच प्रदूषण कमी करेल आणि राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण करेल.