शाळेतील विद्यार्थी संख्या घटली तरीही 450 नवीन शाळांचा प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  खाजगी संस्थांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरुन पालक खाजगी शैक्षणिक संस्था चालकांमध्ये वाद सुरू आहे. त्यात आता पुन्हा स्वयम् अर्थ साहित्य नव्या शाळा सुरू करण्यासाठी या वर्षात तब्बल चारशे वीस नवीन प्रस्ताव विभागातील पाच जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

अनेक पालक शुल्क भरावे लागेल म्हणून विद्यार्थ्यांचे पुढील वर्षास प्रवेश घेत नाही. त्यामुळे या शाळांना विद्यार्थी मिळणार तरी कुठून अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे करणामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वच शाळा बंद आहेत आता ही शाळा सुरू करण्याबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत शाळेकडून लिंक पाठवल्यानंतर मुलांचे वर्ग सुरू होतात त्यातही आता ज्या मुलांनी शुल्क भरलेले नाही अशा विद्यार्थ्यांना लिंक न पाठविणे किंवा व्हाट्सअप ग्रुप मधून काढून टाकल्याचा तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिल्पावरून पालक व संबंधित शैक्षणिक संस्थांकडे नेहमीच खंडा जगी सुरू आहेत तरीही यंदा औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड ,जालना, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातून नव्या शाळा सुरू करण्यासाठी 420 प्रस्ताव दाखल झाले आहेत.