कराडला सरपंच पदासाठी 47 तर सदस्य पदासाठी 193 अर्ज दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्यातील मुदत संपलेल्या 44 ग्रामपंचायतींसाठी बुधवार दि. 30 रोजी सरपंच पदासाठी 14 अर्ज, तर सदस्य पदासाठी 84 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी व मंगळवारी मिळून सरपंच पदासाठी एकूण 33 अर्ज, तर सदस्य पदासाठी 109 अर्ज दाखल झाले. आजअखेर सरपंच पदासाठी एकूण 47, तर सदस्य पदासाठी एकूण 193 अर्ज दाखल झाले आहेत.

बुधवारी दिवसभरात सरपंच पदासाठी दाखल झालेल्या अर्जात तारुख 1, दुशेरे 1, गोंदी 2, हिंगनोळे 2, घोलपवाडी 1, आणे 1, अंधारवाडी 1, कळंत्रेवाडी 1, मनू 1, कोरेगाव 1, गणेशवाडी 1, रेठरे खुर्द 1, आटके 1 असे एकूण 14 अर्ज दाखल झाले आहेत.

तर दिवसभरात सदस्य पदासाठी दाखल झालेल्या अर्जात हनुमानवाडी 3, हवेलवाडी 2, दुशेरे 1, गोंदी 1, हिंगनोळे 9, सावळवाडी 3, अंतवडी 3, शामगांव 4, भांबे 5, डेळेवाडी 4, आणे 3, कुसुर 2, पाडळी (हेळगाव) 1, मनू 7, कोरेगाव 4, गणेशवाडी 4, रेठरे खुर्द 2, जुळेवाडी 5, कासारशिरंबे 3, सुपने2, किवळ 1, आटके 2, चरेगाव 2, तळबीड 5, वडगाव हवेली 5 असे एकूण 84 अर्ज दाखल झाले आहेत.