पाटण मतदार संघातील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 49 कोटी 70 लाखाचा निधी : शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गतवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग व पूलांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईसाठी 49 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गतवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते. त्यामुळे डोंगरी व दुर्गम भागात दळण- वळण मोठी गैरसोय निर्माण झाली होती. गतवर्षापासून नुकसान झालेल्या रस्ते व पूलांचे पुनर्बांधणीसाठी शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांमधून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील होते. शिवसेना-भाजपा युतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे पाटण तालुक्यातील नुकसान झालेल्या रस्ते व पुलांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी मंजूर होण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार मुंबई या ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 49कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामांमध्ये पाटण- मणदुरे- जळव- तारळे- पाल रस्ता रामा 398 किमी 13/00 ते 18/00 भाग मणदुरे ते जळवखिंड रस्ता सुधारणा 4 कोटी, बनपुरी- अंबवडे- कोळेकरवाडी- उमरकांचन रस्ता प्रजिमा 125 कि. मी. 0/00 ते 13/00 (भाग कि. मी. 10/00 ते 13/00 कोळेकरवाडी ते उमरकांचन) चे रूंदीकरण व सुधारणा 4 कोटी, भोसगांव- आंब्रुळकरवाडी- नवीवाडी- रुवले- कारळे- पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि. मी. 0/00 ते 12 /500 (भाग कि. मी. 10 /500 ते 12 /500 – नवीवाडी ते कारळे) चे बांधकाम 02 कोटी 70 लक्ष, त्रिपुडी मुळगांव -कवरवाडी- नेरळे- गुंजाळी- लेंढोरी- मणेरी- चिरंबे- काढोली- चाफेर- रिसवड- ढोकावळे रस्ता प्रजिमा- 123 कि. मी. 4/500 येथे कवरवाडी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम 01 कोटी 50 लक्ष, बनपुरी- अंबवडे- कोळेकरवाडी- उमरकांचन रस्ता प्रजिमा 125 कि. मी. 3/100 वांग नदीवर भालेकरवाडी (बनपूरी) येथे मोठ्या पुलाचे बांधकाम 4 कोटी, रा. मा. 136 ते सुपने- किरपे आणे आंबवडे- काढणे ते प्रजिमा- 55, प्रजिमा- 66 कि. मी. 0/00 ते 14/800 (भाग कि. मी. 13/00 ते 14/800 -पांढरेचीवाडी ते काढणे फाटा) चे बांधकाम 02 कोटी 50 लक्ष, भोसगांव- आंब्रुळकरवाडी- नवीवाडी- रुवले- कारळे- पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि. मी. 0/00 ते 12/500 भाग कि. मी. 7/00 ते 10/00 मध्ये दोन पुलांचे बांधकाम 3 कोटी, सातारा- गजवडी- चाळकेवाडी- चाफोली- पाटण रस्ता प्रजिमा 29 किमी 26/500 ते 30/00 भाग चाळकेवाडी ते मरड रस्ता सुधारणा 20 कोटी, नागठाणे- तारळे- पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी 14/00 ते 22/00 भाग पांढरवाडी- वजरोशी ते बांधवाट रस्त्याची सुधारणा 5 कोटी, नागठाणे- तारळे- पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी 23/00 ते 24/00 भाग बांधवाट ते विरेवाडी फाटा रस्त्याची सुधारणा 1 कोटी 50 लक्ष, गमेवाडी- कडववाडी- पाडळोशी- मसुगडेवाडी रस्ता प्रजिमा 130 कि. मी. 7/300 वर धायटी, ता. पाटण गावाजवळील ओढ्यावर पुलाचे बांधकाम 1 कोटी 50 लाख या 11 कामांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकास कामांची लवकरच निविदा कार्यवाही करण्यात येऊन दळण- वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.