Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget Cars : जर आपण नवीन कार घ्यायचा विचार करत असाल तर 10 लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या या भारतीय कार आपल्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतील. 10 लाख रुपयांपर्यंतच्या या कार्समध्ये हॅचबॅक, सेडान आणि सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीसारखे अनेक चांगले पर्याय मिळतील. तर आजच्या या बातमीमध्ये आपण बजटमध्ये येणाऱ्या टॉप 5 कारबाबतची माहिती जाणून घेयूयात…

Tata Punch Price - Images, Colours & Reviews - CarWale

Tata Punch ही SUV स्टॅन्स असलेली हॅचबॅक कार आहे. जर आपण चांगली जागा आणि हाय ग्राउंड क्लीयरन्स असलेल्या कारच्या शोधात असाल तर हा एक चांगला पर्याय ठरेल. यामध्ये फक्त 1.2-लिटर पेट्रोल इंजिन मिळेल, मात्र या कारमध्ये जबरदस्त ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT युनिट मिळेल. सध्या कारची एक्स-शोरूम किंमत 5.93 लाख ते 9.49 लाख रुपये आहे. Budget Cars

Honda Amaze S MT 1.2 Petrol Price in India - Features, Specs and Reviews - CarWale

जर आपण सबकॉम्पॅक्ट सेडानच्या शोधात असाल तर Honda Amaze हा एक चांगला पर्याय ठरेल. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळेल. या दोन्हीमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायी CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. सध्या या कारची एक्स-शोरूम किंमत 6.63 लाख ते 11.50 लाख रुपये आहे. Budget Cars

Nissan Magnite Price (December Offers!), Images, Review & Colours

जर आपण पंच पेक्षा थोडी मोठी कार घेण्याचा विचार करत असाल तर Nissan Magnite हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. आता, Magnite ही पेट्रोल-ओन्ली सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. यामध्ये मात्र 1.0-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन किंवा 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळेल. या दोन्हीमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतील. या कारची किंमत 5.97 लाख ते 10.54 लाख रुपये आहे. Budget Cars

Kia Sonet Price - Images, Colours & Reviews - CarWale

जर आपण मॅग्नाइटपेक्षा जास्त प्रीमियम आणि आणखी चांगली दिसणारी कारच्या शोधात असाल, तर Kia Sonet कडे पाहू शकता. या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये जबरदस्त फिट आणि फिनिशिंग सहीत चांगले फीचर्स देखील मिळतात. त्याचबरोबर यामध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय देखील मिळतील. या कारमध्ये नॅच्युरली एस्पिरेटेड 1.2-लिटर पेट्रोल इंजिन, 1.0-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल मोटर देण्यात आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 7.47 लाख ते 13.99 लाख रुपये आहे. Budget Cars

i20 Highlights | Cars - Hyundai Worldwide

आपण Hyundai i20 देखील विचारात घेऊ शकता. या कारमध्ये उत्तम फिट आणि फिनिशिंग, मॉडर्न कम्फर्ट आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह स्मार्ट टेक फीचर्स मिळतील. या कारमध्ये डिझेल इंजिनसह नॅच्युरली एस्पिरेटेड 1.2-लिटर पेट्रोल आणि 1.0-लिटर टर्बो इंजिनचा पर्याय मिळतो. सध्या या कारची एक्स-शोरूम किंमत 7.07 लाख ते 11.63 लाख रुपये आहे. Budget Cars

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hyundai.com/in/en/find-a-car/i20/highlights

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरांनी पकडला वेग, आजचे नवीन दर तपासा
Stock Tips : बाजारातील तेजीच्या दरम्यान ‘हे’ 5 स्टॉक्स अल्पावधीत देऊ शकतात मोठा नफा
EPFO पोर्टलवर घरबसल्या अशा प्रकारे तपासा आपल्या पेन्शनचे स्टेट्स
‘या’ बँका Personal Loan वर देत आहेत आकर्षक व्याजदर
PIB Factcheck : केंद्र सरकार सर्व आधार कार्डधारकांना देणार 80,000 रुपये, जाणून घ्या या मेसेजमागील सत्यता