5G Smartphones : भारतात विकले जाणारे ‘हे’ 5 स्वस्त 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 5G Smartphones : सध्या देशभरात 5G सर्व्हिस बाबत चर्चा सुरु झाली आहे. कारण नुकतेच काही दिवसांपूर्वी अखेर भारतात 5G सर्व्हिस सुरु केली गेली आहे. मात्र यासाठी ग्राहकांना नवीन सिम कार्ड खरेदी करावे लागेल. तसेच, 5G ला सपोर्ट करणारा स्मार्टफोन वापरावा लागेल. चला तर मग आज आपण भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन बाबत माहिती जाणून घेउयात…

Análise completa do Poco M4 Pro 5G - Análises

Poco M4 Pro 5G (किंमत 14,690 रुपये)

या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. गेमिंगची आवड असणाऱ्यांना हा फोन खूप आवडेल. हा फोन पंच होल आणि 90Hz च्या रीफ्रेश रेट सहीत येतो. त्याचा रिफ्रेश रेट स्क्रोलिंग आणि एनिमेशन्सना आणखी स्मूथ करेल. तसेच गेमर्सना या फोनच्या डिस्प्लेचे 240Hz टच सॅम्पलिंग देखील आवडेल. Poco M4 Pro 5G च्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील उपलब्ध आहे. 5G Smartphones

Redmi Note 11 Pro+ 5G Review | Story

Redmi Note 11 Pro Plus 5G (किंमत 19,999 रुपये)

या Redmi फोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 nits पीक ब्राइटनेससह 6.67-इंच फुल HD+ (1080×2400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. तसेच तो ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC ला सपोर्ट करेल. या Redmi Note 11 Pro+ 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे ज्यामध्ये f/1.9 लेन्ससह 108-मेगापिक्सेल Samsung HM2 प्रायमरी सेन्सर, f/2.2 लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल सेन्सरचा समावेश आहे. तसेच f/2.4 लेन्ससह मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा तसेच f/2.45 लेन्ससह 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. 5G Smartphones

iQoo Z6 5G goes on sale in India: Price, launch offers and more - Times of India

iQoo Z6 5G (किंमत रुपये 15,499)

या फोनमध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येईल. हा iQOO Z6 5G फोन Qualcomm Snapdragon 695 चिपसेट Android 12 वर काम करतो. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 18W चार्जरसह येते. 5G Smartphones

Samsung Galaxy M13 5G: First Look

Samsung Galaxy M13 5G (किंमत 13,999 रुपये)

Samsung चा हा एक बजटवाला 5G फोन आहे. ज्यामध्ये चांगला कॅमेरा आणि बॅटरी मिळेल. Samsung च्या या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD + Infinity-V डिस्प्ले असेल. तसेच या फोनमध्ये Octa-core Exynos 850 चा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB आणि 128GB या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. त्याचबरोबर या फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवता येईल. 5G Smartphones

Samsung Galaxy M33 5G smartphone review - Is 120 Hz enough in a mid-range phone? - NotebookCheck.net Reviews

Samsung Galaxy M33 5G (किंमत 16,999 रुपये)

Galaxy M33 5G मध्ये 6.6-इंचाचा TFT फुल एचडी प्लस LCD डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x2408 आहे. तसेच त्याचा रिफ्रेशिंग रेट 120Hz असेल. या फोनमध्ये 5G चिपसेट Exynos 1280 octa-core SoC वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर पॉवरसाठी, या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली जाईल, जी 25W USB टाइप C फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Galaxy M33 5G फोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे. सेकंडरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. यासोबत 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या पुढील भागात 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध असेल. 5G Smartphones

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.samsung.com/in/smartphones/galaxy-m/galaxy-m33-5g-blue-128gb-storage-6gb-ram-sm-m336bzbpins/buy/

हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा