हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण अनेक कंपन्यांमध्ये पाहिले आहे की, कर्मचारी हे आठवड्यातून पाच दिवस काम करतात. आणि शनिवारी रविवारी दोन दिवस सुट्ट्या घेतात. आता हीच मागणी बँकांनी देखील केलेली होती. आठवड्यातील पाच दिवस काम करून दोन दिवस सुट्टी घेण्याची मागणी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मागील आणि दिवसापासून केलेली आहे. परंतु हा बदल लवकरच खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये दिसू शकतो. आणि या दिशेने प्रयत्न देखील चालू आहेत. या मागणीबाबत इंडियन बँक कॉन्फिडरेशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात एकमत झालेले आहे.
आतापर्यंत बँकांनाही प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथा शनिवारी सुट्टी दिली होती. उर्वरित दोन शनिवार यांना बँकांमध्ये काम करावे लागत होते. 2015 पासून बँकांनी जर शनिवारी सुट्टी द्यावी अशी मागणी केली होती. आणि परंतु जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली, तर इतर पाच दिवस बँकांच्या कामाच्या वेळेतही बदल होणार आहे. सध्या बँकेचे कामकाज हे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करतात. परंतु जर शनिवारी रविवारी सुट्टी देण्याचा नाही नवीन नियम मंजूर झाला, तर बँका सकाळी 9 वाजून 45 वाजता मिनिटांनी उघडतील आणि सायंकाळी 5: 30 वाजता बंद होईल. याचा अर्थ कर्मचारी दिवसातून 45 मिनिटात अतिरिक्त काम करतील.
2015 मध्ये सरकार RBI आणि IBA यांच्यात झालेला करारानुसार महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा नियम लागू केला होता. आणि तेव्हापासूनच अनेक संघटनांनी शनिवारी आणि रव्याचे दोन्ही दिवशी सुट्ट्या जाहीर करावे. यासाठी प्रयत्न करत होता. परंतु आता यावर एकमत झालेले असून लवकरच शासनाच्या अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. याबाबत या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस सरकार ठोस निर्णय घेईल अशी माहिती आलेली आहे.