येत्या 7 दिवसात पूर्ण करा ‘ही’ 5 महत्वाची कामे अन्यथा मिळू शकेल Income Tax ची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : 2022-23 हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास आता फक्त एक आठवडाच बाकी आहे. 31 मार्च 2023 रोजी पर्यंत आपल्याला इन्कम टॅक्स वाचवण्याची शेवटची संधी असेल. त्यामुळे सर्व करदात्यांनी येत्या 7 दिवसांत इन्कम टॅक्सशी संबंधित 5 कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये जर चूक झाली तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस तर मिळेलच. मात्र यासोबतच हजारो रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरू होत असल्याने चालू आर्थिक वर्षातील अनेक कामे त्याआधीच निकाली काढण्याची गरज आहे. जर आपण ती अजूनही केली नसेल ती करण्यासाठी आपल्याकडे 31 मार्चपर्यंतचा अवधी बाकी आहे. Income Tax

Tax saving: जानिए टैक्स सेविंग इन्वेस्टमेंट क्यों है आपके लिए जरूरी! कैसे  चुनें बेहतर इन्वेस्टमेंट प्लान | Zee Business Hindi

कर बचत गुंतवणुक करा

हे लक्षात घ्या कि, कर वाचवण्यासाठी दरवर्षी करदात्यांकडून विविध योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. जर आपण यावर्षी अजूनही ते केले नसेल तर 31 मार्चपर्यंतच वेळ बाकी आहे. 2022-23 साठी सर्व कर बचत गुंतवणुका या अंतिम मुदतीआधीच पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतर केलेली गुंतवणूक पुढील आर्थिक वर्षात जोडली जाईल. Income Tax

Advance Tax 2022: Liability, Computation, Due Dates, Payment

एडव्हान्स टॅक्स भरल्याने दंड वाचेल

TDS/TCS आणि MAT कापूनही ज्या करदात्यांचे कर दायित्व 10,000 रुपयांपेक्षा जास्त असलेल्यांना दरवर्षी 4 हप्त्यांमध्ये एडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. अशा करदात्यांना 15 मार्चपर्यंत पूर्ण 100 टक्के एडव्हान्स टॅक्स भरायचा होता, मात्र जर असे करण्यात चुक केली तर ते 31 मार्चपर्यंत हे काम पूर्ण करता येईल. जर त्यानंतरही असे केले नाही तर व्याजासहीत टॅक्स भरावा लागेल. Income Tax

How to decide life insurance policy term - The Economic Times

विमा पॉलिसीसाठी फॉर्म 12BB सादर करणे

जर आपण विमा पॉलिसी घेतली असेल आणि त्याचा प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर 1 एप्रिल नंतर मॅच्युरिटी रकमेवर कोणतीही कर सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे, 31 मार्चआधीच प्रीमियम भरून कर सवलतीचा लाभ घ्या. यानंतर, नवीन नियमांनुसार प्रीमियमवर कर भरावा लागेल. तसेच जर आपण पगारदार व्यक्ती असाल तर 31 मार्चपूर्वी फॉर्म 12BB सबमिट करावा लागेल. यामध्ये एचआरए, एलटीसी होम लोनचे व्याज इत्यादी तपशील देऊन कर सवलत मिळवता येते.

PAN Card, Aadhaar Card Linking Deadline Is June 30: How to Check Status, Link  Aadhaar-PAN Online | Technology News

पॅन-आधार लिंक

31 मार्चपूर्वी आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे पॅन आणि आधार लिंक करणे. आतापर्यंत, सुमारे 20 टक्के पॅनधारकांनी लिंक करण्याचे काम केलेले नाही. आता हे काम 1000 रुपये भरून करता येणार आहे. तसेच ही वेळही चुकवल्यास 1 एप्रिलपासून आपले पॅनकार्ड इनव्हॅलिड होईल. ज्यानंतर आपल्याला ITR भरते येणार नाही. तसेच कोणत्याही बँकेमध्ये खाते देखील उघडता येणार नाही. Income Tax

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/

हे पण वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत झाले बदल, जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे दर
ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.25% व्याज
अदानीनंतर Hindenburg Report ने जॅक डोर्सीच्या ‘Block Inc.’ लावला सुरुंग, क्षणार्धात शेअर्स कोसळले
Mukesh Ambani बनले जगातील 9 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती, पहा लिस्ट
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट