1 ऑक्टोंबरपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात होणार ‘हे’ 5 मोठे बदल; खिशाला बसणार कात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख तर, उद्या ऑक्टोबर महिन्याची 1 तारीख आहे. या 1 तारखेपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात पाच महत्त्वाचे मोठे बदल होणार आहेत. या नवीन बदलांमुळे नागरिकांच्या खिशाला थेट कात्री बसणार आहे. तसेच त्यांचे आर्थिक गणित देखील बिघडू शकते. उद्यापासून स्वयंपाक घर ते लहान बचत योजनापर्यंत नवीन बदल लागू होणार आहेत. त्यामुळे आज आपण याच महत्त्वाच्या बदलांविषयी जाणून घेणार आहोत.

1) एलपीजीच्या किंमती – ऑक्टोंबर महिन्यात एलपीजीच्या किंमतीमध्ये चढ-उतार पाहिला मिळू शकतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींमध्ये बदल होत असतात. त्यामुळे उद्याच्या 1 तारखेला देखील एलपीजीच्या किमतीत फरक पडू शकतो. यासोबतच सीएनजी-पीएनजी आणि एअर टर्बाइन फ्युएलच्या किंमतींमध्येही बदल होऊ शकतात. परंतु एकंदरीत एलपीजीच्या किमतींमध्ये घट होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्याची 1 तारीख नागरिकांना दिलासा देणारी ठरू शकते.

2) TCS नियम लागू – उद्यापासून टीसीएस लागू होणार आहे.  1 ऑक्टोबरपासून, वैद्यकीय आणि शिक्षणाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी 7 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास 20% TCS लागू होणार आहे. एका आर्थिक वर्षात 7 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी व्यवहार केल्यास टीसीएस लागू होणार नाही. TCS च्या नवीन नियमामुळे परदेश प्रवासावर होणाऱ्या खर्चांवर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे हा दुसरा एक मोठा बदल 1 ऑक्टोंबर पासून होणार आहे.

3) 2 हजार नोटा बंद – 1ऑक्टोंबर पासून म्हणजेच उद्यापासून 2000 च्या नोटा चालणार नाहीयेत. 19 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या 2 हजारच्या नोटा फक्त सप्टेंबर महिन्यात पर्यंत वापरण्याचे परवानगी होती. मात्र आता उद्यापासून 2 हजार रुपयांच्या नोटा बाजारात चालणार नाहीयेत. तसे असले तरी, रिझर्व बँक या नोटा बँकेत परत करण्याची मुदत वाढवू शकते.

4) जन्म प्रमाणपत्र – 1 ऑक्टोंबरपासून संपूर्ण राज्यात जन्म प्रमाणपत्र हाच सर्वात महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जाणार आहे. यापूर्वी आपण प्रत्येक शासकीय कामे करताना आधार कार्डचा वापर करत होतो. मात्र आता इथून पुढे कोणत्याही कामासाठी आपल्याला जन्मपत्र वापरावे लागणार आहे. शाळेत प्रवेश घेणे, मतदान यादी तयार करणे, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, परीक्षा फॉर्म भरणे, सरकारी नोकरीत नियुक्ती अशा सर्व ठिकाणी जन्मदाखला हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

5) लहान बचत योजना – उद्याची तारीख लहान बचत योजनांशी संबंधित लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोंबरपासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपडेट न करणाऱ्या गुंतवणूकदारांची खाती निलंबित केली जाऊ शकतात. ज्या नागरिकांची भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासारख्या लहान बचत योजनांमध्ये खाती आहेत त्यांची खाती निलंबित करण्यात येऊ शकतात.