हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट सुष्टीमध्ये मनोरंजनासोबतच काही महत्वाचे विषय चर्चेत आले आहेत. या चर्चेच्या विषयामुळे अनेक चित्रपट जबरदस्त गाजले , तर काही गाजले नाहीत. तसेच अनेक चित्रपट काही कारणास्तव वादाचा जाळ्यात सापडले. यामागे बरीच कारणे असून, काही चित्रपटांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात केला, त्यामुळे अनेक लोक नाराज झाले . तर काहींनी सत्यकथांना इतके बदलले की त्या कथांमधील वास्तविक व्यक्तींना वगळल्यासारखे वाटले. त्यामुळे तुम्हाला जर असे चित्रपट माहित नसतील तर आज आम्ही तुम्हाला 2024 मधील सर्वात वादग्रस्त चित्रपटांची माहिती सांगणार आहोत.
लेट नाईट विथ द डेव्हिल –
या चित्रपटात एआय-जनरेटेड आर्टचा (generated visuals) वापर मोठ्याप्रमाणात केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे . चित्रपटाच्या निर्मितीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर हा हॉलीवूडमधील कामगारांच्या भविष्यावर परिणाम करू शकतो, अशी टीका अनेकांनी केली आहे. तसेच एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेल्या दृश्यांवर लोकांनी आक्षेप घेतला. यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच निर्माता आणि कलाकारांना स्पष्टिकरण द्यावे लागले.
सिव्हिल वॉर –
निवडणुकीच्या वर्षात असा अतिक्रमण करणारा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या गरजेबद्दल चर्चा सुरू झाली. या चित्रपटामुळे लोकांना लोकांविरुद्ध हिंसाचार करण्यास प्रेरित करू शकते आणि विषारी राजकीय वातावरणात सिव्हिल वॉर ही संकल्पना अप्रिय मानली जाऊ शकते अशी चिंता व्यक्त केली गेली. तसेच हा चित्रपट अमेरिकेवर भाष्य करण्यासाठी नव्हता, तर आधुनिक जगातील लोकांमधील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या दुराव्यावर होता अशी टीका केली गेली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले .
मॅडम वेब –
सोनी पिक्चर्सच्या या सुपरहिरो चित्रपटावर आधीच टीका होत होती. त्यातच मुख्य अभिनेत्री डकोटा जॉन्सनच्या मुलाखतींतील विवादास्पद विधानांनी चित्रपटावर वाद वाढवला. या कॉमिक बुक चित्रपटाच्या संवादांवरून वाद निर्माण झाले. तर खराब पटकथा आणि फॅन-सर्विस यामुळे चित्रपटाला टिकेचा सामना करावा लागला.
कुंग फू पांडा 4 –
या ॲनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले, पण त्याचवेळी ड्रीमवर्क्स ॲनिमेशन स्टुडिओने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, ज्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये संताप पसरला. यामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील अन्यायावर जोरदार टीका झाली .
आर्थर द किंग –
मायकेल लाइट आणि आर्थर कुत्र्याच्या सत्यकथेत इक्वाडोरची पार्श्वभूमी बदलून डोमिनिकन रिपब्लिक दाखवल्याने वाद निर्माण झाला. इक्वाडोरच्या नागरिकांनी या बदलावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हे चित्रपट त्यांच्या वादग्रस्त निर्णयांमुळे 2024 मधील चर्चेचा विषय ठरले.