जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे (accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असाच एक अपघात (accident) जालना जिल्ह्यात घडला आहे. या भीषण अपघातात (accident) 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव आयशर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात (accident) झाला. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा रोडवर हा अपघात (accident) झाला. भरधाव आयशर आणि अ‍ॅपे रिक्षाची समोरासमोर धडक झाली होती. हा अपघात एवढा भीषण होता की आयशरच्या धडकेत रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात तब्बल 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील (accident) जखमींना उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील सर्व मृत व्यक्ती हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील रहिवाशी होते.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे
परवीन बी राजू शहा, आलिया राजू शहा, मुस्कान राजू शहा, कैफ अशपाक शहा आणि मनीषा तिरुखे अशी अपघातात (accident) मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!