UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI : सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढण्याबरोबरच त्यामधील फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशी फसवणूक होऊ नये यासाठी आपल्या योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबतीत अनेक कंपन्या ग्राहकांना सतत सावध करत असतात. ऑनलाइन पेमेंट करताना फसवणूक होण्याची भीती नेहमीच असते. अशा परिस्थितीत युपीआय किंवा नेट बँकिंग वापरताना स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे हे समजून घेउयात…

UPI transactions cross Rs 10-trillion mark in May | The Financial Express

कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका

आजकाल आपल्याला दररोज विशेषत: सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्सचे मेल आणि व्हॉट्सऍप मेसेजेस येत असतात. याद्वारे लिंक्स पाठवून आपल्याकडून ‘रिवॉर्ड’ किंवा ‘कॅशबॅक’ मिळवण्यासाठी UPI पिन आणि इतर बँकिंग डिटेल्स शेअर करण्यास सांगितले जाते. अशा लिंक्सवर क्लिक केल्यास आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे याबाबत नेहमीच सावधगिरी बाळगा.

UPI PIN Fraud Online Payment Fraud Cyber crime Bhim App SSND - UPI PIN से होने वाले फ्रॉड से कैसे बचें, NPCI ने किया अलर्ट – News18 हिंदी

UPI पिन/नेट बँकिंग पासवर्ड कोणाबरोबरही शेअर करू नका

सायबर फसवणूक टाळाण्यासाठी आपला चार किंवा सहा अंकी UPI पिन किंवा नेट बँकिंग पासवर्ड कोणाबरोबरही शेअर करू नका. अन्यथा, आपल्या खात्यातून पैसे गायब होतील. तसेच, जर कोणी बँकेचा कर्मचारी म्हणून कॉल करत असेल आणि आपल्या बँक खात्याचे डिटेल्स विचारत असेल, तर कोणतीही माहिती कधीही शेअर करू नका. वास्तविक, हे कॉल सायबर गुंडांकडून केले जातात.

How to find my UPI ID on different UPI apps ? - Upstox Help Center

पैसे पाठवण्यापूर्वी UPI आयडी व्हेरिफाय करा

पैसे पाठवण्यापूर्वी किंवा मिळवण्यापूर्वी युपीआय आयडी व्हेरिफाय करा. तसेच, पैसे पाठवताना, ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा युपीआय आयडी आणि फोन नंबर दोनदा तपासा, अन्यथा चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

Using UPI app? What to do if lose your mobile phone | Mint

मोबाईल सुरक्षित ठेवा

आजकाल बँकांची अबेक कामे डिजिटल बँकिंगद्वारे मोबाईलवरूनच केली जातात. अशा परीस्थितीत आपला मोबाईल नेहमी लॉक ठेवा. कारण मोबाईलमधील बँकिंग आणि पेमेंट ऍप्सशिवाय, असेही अनेक ऍप्स आहेत ज्याद्वारे सायबर स्कॅमर कडून आपला महत्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो.

वेबसाइट सिक्योरिटीवर लक्ष द्या

काहीवेळा नवीन किंवा अज्ञात वेबसाइटवरून खरेदी केल्यानेही फसवणूक होते. कारण बाजारात अशा अनेक नवीन वेबसाइट्स आहेत, ज्याद्वारे युझर्सची फसवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत, अशा अज्ञात वेबसाइटवर पेमेंट करण्यासाठी पासवर्ड आणि बँकिंग आयडी टाकताच, आपली सर्व माहिती लीक होऊन फसवणुक केली जाईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.upi.com/

हे पण वाचा :

Nora Fatehi ने सुकेश चंद्रशेखरशी संपर्क तोडला होता, मात्र जॅकलीन गिफ्ट्स घेत राहिली

IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सकडून Mark Boucher ची मुख्य प्रशिक्षकपदी निवड

LPG : आता मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे घरपोच मिळवा सिलेंडर

Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा

Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी