हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 चा अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये सादर होणार असून, या बजेटमध्ये जेष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. कोविड-19 महामारीपूर्वी भारतीय रेल्वेने वरिष्ठ नागरिकांना ट्रेन तिकीटांवर 40 ते 50 टक्के सूट दिली होती. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा वयस्कर पुरुषांना 40% आणि 58 वर्षे किंवा त्यापेक्षा वयस्कर महिलांना 50% सूट मिळत होती. ही सुविधा मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी आणि दुरंतो या प्रमुख गाड्यांवर लागू होती. पण कोविडच्या काळात ही सूट बंद करण्यात आली. परंतु देशात परिस्थिती सुधारल्यावरही ही सूट पुन्हा लागू करण्यात आलेली नाही. यावर ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा याबाबत अपेक्षा आहेत की, नवीन बजेटमध्ये या सवलतीचा विचार करून , हि सेवा सुरु करतील.
ट्रेन तिकीटावर मिळणारी सवलत –
कोविड-19 महामारीदरम्यान या सवलतीचा लाभ बंद करण्यात आला. आता देशातील परिस्थिती पुन्हा सामान्य झाली असली तरी, ही सवलत पुन्हा सुरू केलेली नाही. रिटायरमेंटनंतर उत्पन्नाचे पर्याय कमी होतात, त्यामुळे ट्रेन तिकीटावर मिळणारी सवलत वरिष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारकडे हि मागणी केली आहे.
वरिष्ठ नागरिकांची मागणी –
2020 पासून ही सवलत बंद झाल्यानंतर वरिष्ठ नागरिकांनी वारंवार सरकारकडे याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की ही सवलत फक्त आर्थिक बचत करत नाही, तर देशातील विविध भागांना भेट देण्याची संधीही उपलब्ध करून देते. त्यामुळे त्यांच्या मागणीचा सरकारने विचार करावा , असे सांगण्यात आले आहे.
लाखो नागरिकांना याचा लाभ –
1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटमध्ये वरिष्ठ नागरिकांच्या मागणीकडे लक्ष दिल्यास लाखो नागरिकांना याचा लाभ होईल. राजधानी, शताब्दी, मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये तिकीट बुकिंगसाठी 50% सवलत पुन्हा सुरू होण्याची त्यांना आशा आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की सरकार त्यांच्या या दीर्घकालीन मागणीवर सकारात्मक निर्णय घेईल का. तसेच होणाऱ्या निर्णयाचा काय परिमाण होईल.