शेतकऱ्यांना खुशखबर!! 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान 15 दिवसांत मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातील २८ लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांची कर्जमाफी दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केलं होत. २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमित परफेड केली असल्यास त्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाला. मात्र त्यानंतरच्या कोरोना काळात सरकारच्या तिजोरीत पैसाच नसल्याने नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना अडीच वर्षे वाट पाहावी लागली.

आता बँकांनी दिलेल्या याद्यांची छाननी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम याद्या प्रसिध्द होऊन त्याचे चावडी वाचन होईल. आणि १५ दिवसांत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे. शासकीय नोकरदार, आयकर भरणारा, आमदार, खासदार, माजी मंत्री, २५ हजारांपेक्षा जास्त मासिक निवृत्तीवेतन असलेल्या व्यक्ती (शेतकरी) या कर्जमाफीतून वगळण्यात आल्या आहेत.