तरुणांसाठी खुशखबर! BFSI क्षेत्रात 50 हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स(BFSI), बँकिंग क्षेत्रामध्ये देखील नोकरी करण्याची संधी तरुणांसाठी चालून आली आहे. क्रेडिटकार्ड सेल, पर्सनल फायनान्स आणि रिटेल इन्शुरन्स विक्रीमध्ये वाढ झाल्यामुळे येत्या काळात तब्बल 50 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती टीमलीज कंपनीने एका प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे.

BFSI सेक्टरमध्ये नोकरीची संधी

ऑगस्ट महिन्यात अनेक सणवार आलेले आहेत. तसेच पुढील पाच महिन्यात देखील देशात वेगवेगळे पारंपरिक सण आले आहेत. या सणांसाठीच ग्राहकांच्या खरेदीमध्ये वाढ होणार आहे. या काळात खरेदी करण्यासाठी ग्राहक जास्त प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर करतात. यामुळेच BFSI सेक्टरमध्ये तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ई-कॉमर्स, रिटेल, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि स्मार्टफोन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तरुणांची भरती करण्यात येईल. तसेच, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि इन्शुरन्स प्रॉडक्टची मागणी वाढत असल्यामुळे सुद्धा कंपन्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करू शकतात.

या शहरात भरती प्रक्रिया सुरू

सणासुदीच्या काळात, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, कोलकाता, कोची, विशाखापट्टणम, मदुराई, लखनऊ, चंदिगढ, अमृतसर, भोपाळ आणि रायपूर अशा शहरांमध्ये असणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या पदांसाठी तरुणांची भरती करून घेऊ शकतात. कामाचा व्याप वाढल्यामुळे कंपन्यांना मनुष्यबळाची जास्त आवश्यकता पडते. सध्या दररोज ग्राहकांच्या वेग वेगळ्या मागणीचे प्रमाण वाढल्यामुळे याचा कंपन्यांवर भार पडत आहे. यासाठी कंपन्यांना वेगवेगळी पदे भरण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात कंपन्या महत्त्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करू शकतात. विशेष म्हणजे, या पदांसाठी तरुणांना चांगले मानधन देखील मिळू शकते.

फ्रेशर्सला मागणी

सध्या आयटी क्षेत्रामध्ये देखील वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंपन्या दररोज कोणत्या ना कोणत्या पदासाठी आपली जाहिरात प्रसिद्ध करत आहेत. यामध्ये काही ठराविक कंपन्या फ्रेशर्सला जास्त प्राधान्य देत आहेत. फ्रेशर्सकडे नवीन ज्ञान, अपडेटेड वर्जनची माहिती असल्यामुळे कंपन्या फ्रेशर्ससाठी मागणी करत आहेत. त्यामुळे आगामी काळात फ्रेशरसाठी देखील नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.