500 ची नोट RBI ऩे बदलली? नव्या नोटेवर प्रभू श्रीराम यांचा फोटो; जाणून घ्या यामागील सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अशा जलोषाच्या वातावरणातच सोशल मीडियावर प्रभू राम यांचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट व्हायरल होत आहे. ही नोट RBI नेच जारी केल्याचे म्हणले जात आहे. त्यामुळे आता व्यवहारात लोकांना प्रभू श्रीराम यांचा फोटो असलेली देखील नोट वापरायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र यामागील सत्यच वेगळे आहे, जे आपण जाणून घेणार आहोत.

सध्या सोशल मीडियावर 500 च्या नोटेवर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली नोट चांगलीच चर्चेत आली आहे. यामुळे राम भक्तांना देखील तितकाच आनंद झाला आहे. तसेच काहींना रिझर्व बँकेने ही नोट जारी केल्यामुळे आश्चर्य वाटले आहे. तुम्ही जर या नोटेचा फोटो पाहिला तर एका बाजूला प्रभू श्री राम यांचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला अयोध्येतील भव्य राम मंदिराचा फोटो आहे. या फोटोवर कोठेही गांधीजींचा फोटो आपल्याला दिसत नाही. त्यामुळे या नोटेविषयी सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

नेमके सत्य काय?

परंतु महत्त्वाचे सांगायचे असे की, सोशल मीडियावर व्हायरल होणारी नोट एडिट करून बनवण्यात आली आहे. ही नोट रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आलेले नाही किंवा तशी घोषणा देखील बँकेने केलेली नाही. फोटोशॉपचा वापर करून तसेच लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्या श्रद्धेचा चुकीचा वापर करण्यासाठी ही बनावट नोट बनवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला अशी कोणी नोट दाखवली तर पहिल्यांदा त्या मागील सत्यता तपासा.

दरम्यान, अद्याप रिझर्व बँकेने पाचशेच्या नोटेवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. आरबीआयच्या वेबसाईटवरील अधिकृत माहितीनुसार, 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे.