चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीकडून 51 हजारांचे बक्षीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाईफेक करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी आता 14 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्याचे पालकमंत्री तथा भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. जी व्यक्ती चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम करेल. त्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर एका युवकाकडून चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतरही हे बक्षीस लवकरच मनोज बरकडेला दिले जाईल हा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. या संदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीवरून गंभीर आरोप केले आहेत. “हा हल्ला प्रिप्लॅन होता, कोणत्यातरी पत्रकाराने हे कृत्य केले आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.