51000 युवकांना मिळाली सरकारी नोकरी; पंतप्रधान मोदींनी दिली नियुक्तीपत्रे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी आज आयोजित केलेल्या रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 51000 नव युवकांना नियुक्तीपत्रे दिली. रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून पार पडला. भारतातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील युवकांना या कार्यक्रमाद्वारे ही नियुक्तीपत्रे सुपूर्त करण्यात आली आहे.

पोलीस दलातील नियुक्त्या देण्यात आल्या

कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून 45 वेगवेगळ्या स्थानांवरुन हे नवकर्मचारी उपस्थित होते. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून प्रामुख्याने पोलीस दलातील नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यासह विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFS) नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. देशभरातून निवडलेले नवयुवक, MHA अंतर्गत विविध संस्थांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी), सब-इन्स्पेक्टर (जनरल ड्यूटी) आणि नॉन-जनरल ड्यूटी कॅडर पोस्ट अशा विविध पदांवर रुजू होतील.

कर्मयोगी प्रारंभच्या अंतर्गत दिल जाणार प्रशिक्षण

नियुक्ती देण्यात आलेल्या सर्व नवकर्मचाऱ्यांना iGOT- कर्मयोगी पोर्टलच्या माध्यमातून “कर्मयोगी प्रारंभ ” च्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध असेल. हे कर्मचारी ह्या पोर्टलच्या माध्यमातून कुठेही बसून आपले प्रशिक्षण पुर्ण करू शकतील अशी सुविधा पोर्टलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांनी नवयुवकांचे देश्याच्या अमृत महोत्सवी वर्ष्यात देशसेवेत सामील होत असल्याबद्दल अभिनंदन केले. पोलीस दलात नियुक्ती मिळालेल्या सर्वांना आपण “अमृतरक्षक ” आहात असे देखील संबोधले. सरकार युवकांना सरकारी सेवेत दाखल करून घेण्यासाठी करत असलेल्या चांगल्या बदलांबद्दल त्यांनी माहिती दिली. रोजगार मेळाव्यामार्फत करण्यात आलेल्या नियुक्तीमुळे पोलीस दलाला अधिक बल मिळून पोलीस दल सक्षम व देश अधिक सुरक्षित होईल.