टीम हॅलो महाराष्ट्र। सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) पाठिंबा मिळावा म्हणून भाजपाने टोल फ्री क्रमांक जारी करत मोहिम चालवली आहे. त्यानुसार आतापर्यन्त तब्बल ५२ लाख लोकांनी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देत आपला पाठींबा या कायद्याला नोंदवला आहे अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
याबाबत माहिती देताना अमित शहा म्हणाले कि,”सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा नोंदवण्यासाठी जारी केलेल्या विशेष फोन क्रमांकावर आतापर्यन्त ५ लाख ७० हजार नागरिकांनी मिस कॉल देत आपलं मत नोंदवलं आहे. तर या कायद्याला समर्थन म्हणून भाजपाला सामान्य नागरिकांचे इतर क्रमांकावर आलेले फोन असं मिळून हा आकडा ६८ लाख इतका झाला आहे” असं सांगितलं.”
भाजपा नवीन सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा मिळवा म्हणून देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. यांमध्ये हस्ताक्षर मोहीम, देशभरात ठिकठिकाणी समर्थन रॅली काढणे अशा विविध माध्यमातून प्रयास करत आहे. तसेच या कायद्याविषयी जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जात जनजागृती करत आहेत.