धक्कादायक! विषारी दारू पिल्याने 6 जणांचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हरियाणामध्ये विषारी दारू पिल्याने एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण हरियाणात खळबळ उडाली आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रवींद्र कुमार, सुरेश कुमार, सुरेंद्र कुमार, विशाल सरवन आणि मेहर चंद अशी मृतांची नावे आहेत. तर यातील एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुख्य म्हणजे, विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्या सहा व्यक्तींमधील चार व्यक्ती हे एकाच गावातील आहेत. ही घटना यमुनानगर जिल्ह्यातील मांडेबारी आणि पणजेतो गावात घडली आहे. सुरुवातीला विषारी दारू पिल्याने चार जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर, मांडेबारी शेजारील पणजेतो गावात ही दोन जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिकांनी आरोप लावले आहेत की, गेल्या अनेक दिवसांपासून गावात विषारी दारू विकली जात आहे. मात्र यावर पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीयेत.

सध्या या सर्व प्रकरणाची चौकशी यमुनानगर पोलीस करत आहेत. गावकऱ्यांनी या पोलिसांना माहिती दिली आहे की, दारू पिल्यानंतर मृत्य व्यक्तींना उलट्यांचा त्रास होऊ लागला. तसेच त्यांची दृष्टी जाऊ लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, एकाच गावात सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे शोककळा पसरली आहे. तसेच, याप्रकारणी गावकऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाई मागणी केली आहे.