कराडात ६० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह, तालुक्यातील रुग्णांची संख्या २ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल असलेल्या ७ कोरोना अनुमानित रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. यावेळी सदर अनुमानित रुग्णांपैकी ६० वर्षीय पुरुषाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कराड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६ वर गेला आहे.

कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल करण्यात आलेल्या ७ अनुमानित रुग्णांपैकी उर्वरित ६ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत ९ निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचा नमुनेही निगेटिव्ह आले असल्याचे एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

काल ६ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोविड-19 बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 2 रुग्ण दाखल विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. या एकूण 16 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने  एन. आय. व्ही. पुणे  येथे  पाठविण्यात आले आहेत.

तसेच काल दुपारी जिल्हा रुग्णालय सातारा  येथे तीव्र जंतु संसर्गामुळे दाखल झालेला 25 वर्षीय अनुमानित अत्यावस्थ झाल्याने रात्री 1 च्या सुमारस त्याला कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असून विलगीकरण कक्षात लागू असलेल्या नियमानुसार उपचार चालू आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार पार, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा

करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी

मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर

Leave a Comment