एक गाव, एक गणपती!! 600 वर्षांपूर्वींची ‘कोईळ’ गावची परंपरा पिढ्यांपिढ्या कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरी करण्यात येत आहे. गल्लीपोळापासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील “कोईळ ” गाव आजही आपली जुनी परंपरा राबवत आहे. कोईळ गाव “एक गाव, एक गणपती” या संकल्पनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहे. या गावांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आणला जात नाही तर गावात मानाचा एकच गणपती बसवला जातो. या गणपतीची आरती करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र जमा होतो आणि उत्साहात गणेश उत्सव साजरा करतो.

“एक गाव, एक गणपती”

गेल्या अनेक वर्षांपासून कोईळ गाव “एक गाव, एक गणपती” अशी परंपरा राबवत आहे. या परंपरेमुळे संपूर्ण गाव एकत्र जोडून राहिला आहे. गणेश उत्सवाच्या काळात संपूर्ण गाव एकत्र येऊन गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करतो. गणपती बाप्पासाठी आवश्यक असलेला नैवेद्य देखील एकत्र बनवला जातो. कोईळ गावाच्या मंदिरात एक काळ्या दगडाची गणपतीची मूर्ती आहे. या गणपतीच्या मंदिराला गणेशोत्सवाच्या काळात सजवले जाते. ही परंपरा गावात गेल्या सहाशे वर्षांपासून चालत आली आहे. गावात 80,90 घरे आहेत. तर 300-350 लोकवस्ती आहे. हे सर्वजण एकत्र येऊन गणेशाची आरती करतात.

11 दिवस गावात आनंदाचे वातावरण

गणेश उत्सवासाठी संपूर्ण गावातून शिधा गोळा केला जातो. यशोदा मधूनच गणेश चतुर्थीच्या काळामध्ये भाविकांसाठी महाप्रसाद तयार केला जातो. तसेच गणेश चतुर्थीला गावात कोणत्या घरात नवीन गणपती आणला जात नाही. सर्वजण याच मंदिरात येऊन गणेशाची भक्तिभावाने पूजा करतात. इतकेच नव्हे तर सत्यनारायणाची पूजा करायची असेल तरी याचं मंदिरात केली जाते. गावच्या या परंपरेमुळे गावात अकरा दिवस आनंदाचे वातावरण असते. सर्वजण एकत्र येतात, संवाद साधतात, भक्ती भावाने गणेश उत्सव साजरी करतात.

लग्नपत्रिकेवरही गणेशाची मूर्ती छापण्यास मनाई

600 वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा पिढ्यानुपिढ्या पुढे जात आहे. त्यामुळे गावच्या लोकांना देखील एकत्र येऊनच गणेशोत्सव साजरी करायला आवडते. या काळात गावाच्या बाहेर असलेली युवापिढी देखील गणेश उत्सवासाठी घरी परत येते. सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सव सन साजरी करतात. विशेष म्हणजे, या गावांमध्ये लग्नपत्रिकेवर गणेशाची मूर्ती देखील छापली जात नाही. असे नाही की गावातील लोक गणपतीला मानत नाहीत परंतु गणपतीची विटंबना होऊ नये, त्याचे पावित्र्य जपले जावे यासाठी लग्नपत्रिकेवर गणेशाचे चित्र छापले जात नाही. अशा अनेक कारणांमुळे हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहे.