Electoral Bond च्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या खात्यात 65.6 कोटी रुपये; देणगीदारांची नावे पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयने Electoral Bond ची माहिती जारी केली आहे. कोणत्या पक्षाला किती रुपयांची देणगी मिळाली आणि देणगीदार कोण आहेत हे त्यामुळे समोर आलं आहे. एसबीआयने जारी केलेल्या आकडेवारी नुसार, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल 65.6 कोटी रुपयांची देणगी मिळाली असल्याचे समोर आलं आहे. तसेच कोणी कोणी पक्षाला देणगी दिली आहे त्यांचीही नावे तुम्ही बघू शकता. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) जेव्हा एकत्रित होता तेव्हा 2018 ते जानेवारी 2024 या कालावधीत 65.6 कोटी रुपयांयामध्ये ची देणगी मिळाली. शरद पवार यांची मित्रमंडळी, तसेच उद्योगपतींकडून या देणग्या पक्षाला मिळत गेल्या. यातील बहुतांश कंपन्या या पुण्यातील आहेत. भारती एअरटेल, निओटिया फाऊंडेशन, सायरस पूनावाला, अविनाश भोसले , युनायटेड शिपर्स, बजाज फिनसर्व्ह, अतुल चोरडिया, युनायटेड फॉस्फरस, ओबेरॉय रियल्टी आणि अभय फिरोदिया यांचा समावेश आहे. मे 2019 पर्यंत दिलेल्या देणग्यांचा डेटा सादर करताना राष्ट्रवादीने स्वेच्छेने ही नावे उघड केली आहेत.

जयंत पाटील यांचा दावा मात्र वेगळाच –

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दावा केला की त्यांच्या पक्षाला रोख्यांमधून 50.5 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. “2019 पर्यंत, आम्हाला 31 कोटी रुपये आणि नंतर आणखी 20 कोटी रुपये असे एकूण 50.5 कोटी रुपयांची देणगी आम्हाला मिळाली होती. मात्र 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक निधी वापरण्यात आला. आता आमच्याकडे फक्त 7 लाख रुपये शिल्लक आहेत. 66 कोटींचा आकडा कुठून आला हे मला माहीत नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडून त्याबाबत माहिती घेऊ असं जयंत पाटील यांनी सांगितलं.