कफ सिरप पिल्याने 68 लहान मुलांचा मृत्यू; न्यायालयाची 23 जणांविरोधात कठोर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कफ सिरप (Cough Syrup) लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याच्या अनेक घटना समोर येत चालल्या आहेत. अशातच डिसेंबर 2022 मध्ये याच कफ सिरपमुळे 68 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उज्बेकिस्तानच्या न्यायालयाने 23 जणांवर कठोर कारवाई करत त्यांना तुरुंगात पाठवले आहे. यामध्ये एका भारतीय नागरिकाचा देखील समावेश आहे. हे प्रकरण नेमके काय आहे आपण जाणून घेऊया.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या एका औषधाच्या कंपनीमध्ये तयार करण्यात आलेले कप सिरप 68 लहान मुलांनी पिल्यामुळे त्यांचा 2022 साली मृत्यू झाला होता. या कफ सिरपचे उज्बेकिस्तानमध्ये वितरण करण्यात आले होते. येथीलच या लहान मुलांनी कप सरफ पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डबल सात महिने या प्रकरणाची उज्बेकिस्तानच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर आज न्यायालयाने क्यूरमॅक्स मेडिकलचे कार्यकारी संचालक राघवेंद्र सिंह प्रताप यांना वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

त्याचबरोबर, न्यायालयाने 23 जणांना देखील तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व आरोपी चोरी, कमी दर्जाच्या आणि बनावटी औषधांची विक्री, पदाचा दुरुपयोग, लाच प्रकरणांमध्ये दोषी आढळले आहेत. आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने 68 मुलांच्या प्रत्येक कुटुंबाला 80,000 अमेरिकी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अपंगत्व आलेल्या 4 मुलांना देखील भरपाई देण्यास सांगितले आहे. ही भरवाई सात आरोपींकडून घेतली जाणार आहे.