हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात जिथे 30% पर्यंत आयकर भरावा लागतो, तिथेच जगात असे काही देश आहेत जिथे एक रुपयाही आयकर (टॅक्स) आकारला जात नाही. अशा देशांमध्ये केवळ वैयक्तिक आयकरच नाही, तर कंपन्यांकडूनही कर घेतला जात नाही. हे देश किती वेगळे आहेत. असे किती देश आहेत , जिथे टॅक्स भरावा लागत नाही , अशा देशांची आज आपण माहिती पाहणार आहोत , तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात .
वनुआटू (Vanuatu) –
ओशियान क्षेत्रातील हे देश आयकर न आकारणारे आहे. याठिकाणी कंपन्यांना 20 वर्षांची करसवलत दिली जाते आणि कंपन्यांकडून फक्त 300 अमेरिकन डॉलर्स (जवळपास 26,000 रुपये) वार्षिक फी घेतली जाते.
कैमॅन बेटे (Cayman Islands) –
उत्तर अमेरिकेतील कॅरेबियन बेटांपैकी एक असलेले कैमॅन बेटे या देशात सुद्धा आयकर आकारला जात नाही. येथे 7.5% स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. गुंतवणूक करणाऱ्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा अस्तित्वात नाही.
बॉर्म्युडा (Bermuda) –
आयकर न आकारणारा आणखी एक देश म्हणजे बॉर्म्युडा. येथे नागरिकत्व देण्याचा कायदा नाही, मात्र 2.5 मिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केल्यास येथे स्थायिक होण्याची परवानगी मिळवता येते.
बहामा (Bahamas) –
कॅरेबियन बेटांवरील बहामा देखील एक झिरो इन्कम टॅक्स नेशन आहे. येथे कॉर्पोरेट टॅक्स फक्त 3% आहे आणि संपत्तीवरील कर 0.75% ते 2% दरम्यान आहे.
युएई –
संयुक्त अरब अमिरातीमध्ये वैयक्तिक आयकर नाही. युएईमध्ये कॅपिटल गेन्स, वारसा कर, भेटींवरील आणि संपत्तीवरील कर न घेतल्याने ते एक आकर्षक गंतव्य ठरले आहे. येथे कॉर्पोरेट कर फक्त 375,000 दि-हाम्सपेक्षा अधिक नफा कमवणाऱ्या कंपन्यांकडून 9% आकारला जातो.
बहरिन (Bahrain) –
बहरिनमध्येही आयकर नाही. याठिकाणी गॅस आणि तेल कंपन्यांकडून 46% कॉर्पोरेट टॅक्स आकारला जातो, तसेच व्हॅट 10% आहे.
सेंट किट्स आणि नेविस (St Kitts and Nevis) –
कॅरेबियन बेटांवरील सेंट किट्स आणि नेविसमध्ये आयकर, डिव्हिडंटवरील कर, रॉयल्टी किंवा व्याजही आकारले जात नाही. येथील कॉर्पोरेट कर 33%, व्हॅट 10 ते 15% आणि संपत्तीवरील कर 0.2% ते 0.3% आहे. हे देश आपल्या आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने आदर्श ठरू शकतात.




