ई-कॉमर्स क्षेत्रात वाढणार नोकऱ्यांची संधी, सणासुदीच्या काळात हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ई-कॉमर्स हा व्यवसाय मोठ्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आणि या ई कॉमर्स कंपन्या सध्या लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या देखील मिळत आहेत. 2023 च्या शेवटी ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये जवळपास 7 लाख लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहे. त्यामुळे आजकाल अनेक लोकांना रोजगाराची संधी देखील निर्माण झालेली आहे. या कंपन्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना चांगला आणि लक्षात राहील असा अनुभव देण्यासाठी तात्पुरत्या गरजेसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढे भारतात अनेक सण साजरे होतात. या सणाच्या वेळी ग्राहक देखील नवनवीन गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी अनेक कंपनी आता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहे.

सणासुदीच्या काळात जॉबची संख्या वाढणार

एका अहवालात असे म्हटलेले आहे की, ई-कॉमर्स कंपन्या या सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या सेवा पूर्ण करण्यासाठी सज्ज असतात. अनेक लोक हे सणासुदीच्या काळात वार्षिक खरेदी करतात. आणि याच काळामध्ये या कंपन्या देखील त्यांच्या ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी खूप चांगली सेवा देतात. आणि या चांगल्या सेवेसाठी आता ई-कॉमर्स सेक्टरमध्ये जवळपास 25 टक्क्यांनी नोकरीच्या संख्येत वाढ होणार आहे.

ई-कॉमर्स सेक्टर हे खूप आशावादी आहे. सणासुदीच्या काळामध्ये अनेक शहरांमध्ये कामगारांची संख्या वाढणार आहे. यामध्ये बेंगळूर, दिल्ली, मुंबई या शहरांमध्ये तर वाढणार आहे. यासोबत वडोदरा, पुणे यांसारखे शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात संख्या वाढणार आहे. सध्या मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरांमध्ये वियरहाऊस, ऑपरेशन्स लाईन, डिलिव्हरी आणि कॉल सेंटर ऑपरेशनमध्ये लोकांना खूप जास्त मागणी आहे. ग्रामीण भागात देखील खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करताना. कंपन्या कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नाही. त्यामुळे ते कामगारांची संख्या वाढवणार आहे.

याबाबत टीमप्लीज सर्विसचे उपाध्यक्ष बालसुब्रमण्यम यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षापासून टमटम कामगारांची मागणी वार्षिक आधारावर 20 टक्क्यांनी वाढत आहे. आणि ही वाढ पुढील दोन ते तीन वर्षापर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात खूप मोठ्या बदल झालेला आहे. आणि कामगारांना रोजगाराची संधी देखील प्राप्त होत आहे.