7 th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! DA मध्ये होणार इतके टक्के वाढ

7 th Pay Commission
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

7 th Pay Commission | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. देशभरातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या गोष्टीची वाट पाहत होते. ती गोष्ट आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी हे महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत होते. आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लवकरच येणार आहे. कारण पुढील महिन्यात डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होण्याची घोषणा होऊ शकते. तसेच त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी देखील मिळू शकते.

डीएमध्ये किती वाढ होणार | 7 th Pay Commission

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबद्दल अजून कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. परंतु दरवर्षीप्रमाणे केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ताची सुधारित माहिती देत असते
त्यामुळे हा महागाई भत्ता येत्या एक महिन्यात कधीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी या महागाई भत्ताच्या वाढीची वाट पाहत होते. परंतु त्यांना हा महागाई भत्ता लवकरच मिळणार आहे. यावेळी केंद्र सरकार महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढ करू शकत असल्याची देखील चर्चा होत आहे. यावर्षी जर महागाई भात्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तीन टक्क्यांनी वाढ केली, तर हा महागाई भत्ता 53 टक्क्यांवर पोहोचेल. या गोष्टीला सध्या उशीर होत आहे
परंतु लवकरच सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

पगार वाढ किती होणार ? | 7 th Pay Commission

सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये जर केंद्रीय 3 टक्क्यांनी वाढ केली, तर त्यांचा डीए 53 टक्क्यांवर पोहोचेल समजा जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मुख्य वेतन हे 30 हजार रुपये असेल. तर सध्या 50% डीएनुसार त्याला 15000 रुपये महागाई भत्ता मिळतो. परंतु जर हा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला, तर त्याच्या पगारातील डीए हा 16900 रुपयांनी वाढेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात दर महिन्याला एकूण 900 रुपयांची वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते देखील वाढणार आहे. आणि त्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे सध्या अनेक केंद्रीय कर्मचारी आहे. त्यांच्या महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत आहेत.